अर्थविश्व

मारुतीकडून तब्बल 3000 कर्मचाऱ्यांची कपात

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने 3000 हंगामी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रात सुरू असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर मारुतीने ही नोकरकपात केली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

कंपनीतून काढण्यात आलेले कामगार कंत्राटी स्वरुपात काम करत होते. मंदीमुळे उत्पादन घटलेले असल्यामुळे मारुतीने त्या कामगारांच्या कंत्राटांचे नूतनीकरण केलेले नाही. मात्र, कायमस्वरुपी कामगारांवर कोणतेही संकट आलेले नाही. 'हा उद्योग व्यवसायाचा एक भागच आहे. जेव्हा मागणी वाढते तेव्हा अधिकाधिक कामगारांची भरती केली जाते आणि जेव्हा मागणी कमी असते तेव्हा कामगारांच्या संख्येत कपात केली जाते', असे मत मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी व्यक्त केले आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेतील विक्री, विपणन, सेवा, विमा, फायनान्स, सुटे भाग, वाहनचालक, पेट्रोल पम्प, दळणवळण यासारख्या घटकांमध्ये नोकऱ्यांची निर्मिती होत असते. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचा परिणाम दिसतो. त्यापेक्षा अधिक मोठा असल्याचेही पुढे भार्गव म्हणाले.

सध्या ऑटोमोबाईलमधील उत्पादनाने नीच्चांक गाठलेला असून, हे क्षेत्र रुळावर येण्यासाठी तिसऱ्या किंवा चौथ्या तिमाहीपर्यत वाट पाहावी लागेल. पुढील आर्थिक वर्षात हे क्षेत्र जोमाने उभे राहिल अशी आशा करू या. जर सरकारने काही अनुकूल निर्णय घेतले तर त्यामुळे परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जीएसटी करात सरकारने कपात करावी, असेही भार्गव यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Political: इम्रान खान यांच्या बहिणीला घरातून ताब्यात घेतले; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात कारवाई

Amravati College Student Case : कॉलेज तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत ठेवले संबंध, फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; १ लाख ३२ हजार हडपले

Western Vidarbha Crop Damage : पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये गणरायाचे विसर्जन करताना Engineering च्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा कस लागणार; लवलिना-नरेंद्रची थेट उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात

SCROLL FOR NEXT