Pakistan Economy  Sakal
अर्थविश्व

Pakistan Economy : पाकिस्तान आर्थिक संकटात; अर्थमंत्री म्हणाले, यात माझी नाही तर...

पाकिस्तान सौदी अरेबियाकडून आर्थिक मदत मागत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pakistan Economy : अर्थमंत्री इशाक दार यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी गुंतवणूकदारांना आश्वासन दिले की, पाकिस्तान कोणाचेही कर्ज बुडवणार नाही.

स्टॉक एक्सचेंजमध्ये पाकिस्तानच्या पहिल्या डेव्हलपमेंट रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट योजनेच्या लॉन्चिंग दरम्यान, अर्थमंत्र्यांनी एका कार्यक्रमात गुंतवणूकदारांना मंदीबाबत माहिती दिली.

"आम्ही कठीण स्थितीत आहोत. आमच्या मागील सरकारने 2016 मध्ये 24 अब्ज डॉलर्स परकीय चलनाचा साठा ठेवला होता. तो आता आमच्याकडे नाही. पण ही माझी चूक नाही. ही व्यवस्थेची चूक आहे," असे दार म्हणाले.

पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये इस्लामिक बाँड्समधील 1 अब्ज डॉलरची परतफेड केली आहे. अशा स्थितीत देश डिफॉल्ट होणे शक्य नाही.

सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानने म्हटले होते की, FY23 मधील वाढ ही सर्वात कमी असेल. याशिवाय विकास दर 3-4 टक्क्यांच्या खाली राहील, असे सांगण्यात आले.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

पाकिस्तान सौदी अरेबियाकडून आर्थिक मदत मागत आहे. ते म्हणाले की, कमी परकीय चलनाच्या साठ्यामुळे एक महिन्याच्या आयातीत घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : चौकशीपूर्वीच रुग्णालयातून धूम ठोकून राणा सूर्यवंशी पसार! बारामती हल्ला प्रकरणात खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT