Share Market 
अर्थविश्व

मादा पांडा गर्भवती, शेअर मार्केटमध्ये तेजी; कसं काय?

जपानच्या टुरिझम सेक्टरमध्ये पांडाला अनन्यसाधारण महत्त्व

सुमित बागुल

शेअरमार्केटमध्ये कधी काय होईल काहीही सांगता येत नाही. कधी कोणत्या बातमीमुळे कोणते शेअर्स भाव वधारेल लागतील हेही सांगता येत नाही. अशीच एक अचंबित करणारी घटना घडलीये जपानमध्ये. जपानमधील एका प्राणी संग्रहालयात एक मादा पांडा गरोदर असल्याचं समजतंय. या १५ वर्षीच्या गरोदर पांडा मुळेच जपानी शेअर बाजारात तेजी झालेली पाहायला मिळाली.

पांडाचं नाव शिन शिन

जपानी मीडिया रिपोर्टनुसार तिथल्या एका प्राणी संग्रहालयात एक मादा पांडा गर्भवती असल्याची बातमी समोर आली. या मादा पांडाचं नाव शिन शिन असल्याचं समजतंय. रिपोर्टनुसार या मादा पांडामध्ये ती खरंच गर्भवती असल्याचं स्पष्टपणे कुठेही सांगलीतलं गेलेलं नाही किंवा प्राणी संग्रहालयाकडून अधिकृतरित्या काहीही सांगितलं गेलेलं नाही. मात्र या एका बातमीमुळे जपानी शेअर बाजारातील काही रेस्टॉरंट सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी आल्याचं पाहायला मिळालं.

कारणही वाचून घ्या

आता तुम्ही म्हणाल आम्ही काहीही सांगतो. एक पांडा गर्भवती राहिल्याने रेस्टॉरंट शेअर्स मध्ये कशी काय तेजी येऊ शकते? तर त्याचं कारणही वाचून घ्या. जपानच्या टुरिझम सेक्टरमध्ये पांडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ पांडा मुळे जपानच्या टुरिझम क्षेत्राला चांगलाच नफा देखील होतो. मीडिया रिपोर्टनुसार जसं लोकांना समजलं की मादा पांडा गर्भवती आहे, तसं त्या प्राणी संग्रहालयाच्या आसपासच्या रेस्टॉरंटच्या शेअर्समध्ये तेजी आली. जपानी शेअर बाजारात गुंतवणूक करणारे असं मानतात की पांडा गर्भवती असल्याने त्या मादा पांडाला पाहायला अनेक टुरिस्ट तिथे येतील. तिथे आल्यानंतर आसपासच्या रेस्टॉरंटमध्ये खाणं पिणं होईल आणि त्या रेस्टॉरंट्सना चांगलाच फायदा देखील होईल. याच अनुमानाने शेअर बाजारातील रेस्टॉरंट शेअर्समध्ये तेजी आल्याचं पाहायला मिळालं.

२०१३ आणि २०१७ मध्ये देखील अशीच तेजी

BBC च्या रिपोर्टनुसार जपानमध्ये एक चिनी रेस्टॉरंट कंपनी आहे जिचं नावं टोटेंको असं आहे. या कंपनीचे अनेक रेस्टॉरंट हे जपानमध्ये आहेत. जेव्हा जेव्हा मादा पांडा गर्भवती असल्याची बातमी येते तेव्हा तेव्हा शुक्रवारी रेस्टॉरंट चेनच्या शेअर्समध्ये ३० टक्के तेजी पाहायला मिळते. टोटेंको कंपनीच्या शेअर्समध्ये याआधी २०१३ आणि २०१७ मध्ये देखील अशीच तेजी पाहायला मिळाली होती. यासोबतच एका फ्रेंच रेस्टॉरंट कंपनीचा देखील शेअर तब्बल ८ टक्क्यांनी वधारलेला पाहायला मिळाला होता. कारण तेही रेस्टॉरंट त्याच प्राणी संग्रहालयाबाहेर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये विशेष सुविधा; खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

शिवसेना कुणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदेंना धक्का बसणार? ठाकरेंच्या वकिलांचा तगडा युक्तिवाद

ODI World Cup 2027: सुनील गावस्करांनी वन डे वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला; ६ फलंदाज, ४ ऑलराऊंडर अन् ५ गोलंदाज

STAR PRAVAH NEW SHOW: उठा, सूठा आणि मला बेटावर भेटा! स्टार प्रवाहवर येतोय नवा कार्यक्रम; प्रोमो पाहिलात का?

Latest Marathi News Live Update : परिच्छेद १५ चा मूळ आधारच राजकीय पक्षांतर्गत असलेला वाद हा आहे - सिब्बल

SCROLL FOR NEXT