Paytm sakal
अर्थविश्व

Paytm Buyback Offer : पेटीएमची शेअर बायबॅक योजना मंजूर; जाणून घ्या काय असेल किंमत

कंपनीने स्टॉक एक्सचेंजला याबाबत माहिती दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने 12 डिसेंबर रोजी 850 कोटी रुपयांची शेअर बायबॅक योजना मंजूर केली आहे. यामध्ये बायबॅक कर आणि इतर व्यवहार खर्चाचा समावेश नाही. हे शेअर्स खुल्या बाजारातून 810 रुपये प्रति शेअर या दराने आणि कमाल 6 महिन्यांच्या कालावधीत खरेदी केले जातील. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला याबाबत माहिती दिली आहे.

कंपनीने म्हटले आहे की, कंपनीने बायबॅक योजनेसाठी खुल्या बाजाराचा पर्याय निवडला आहे आणि सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे.

Paytm ने सांगितले की, जास्तीत जास्त बायबॅक किंमतीवर खरेदी केलेल्या शेअर्सची कमाल संख्या आणि जास्तीत जास्त बायबॅक आकार 10,493,827 असेल. हे मार्च 2022 पर्यंत कंपनीच्या पेड-अप शेअर भांडवलाच्या अंदाजे 1.62% आहे. 850 कोटी रुपयांचा पूर्ण बायबॅक आणि बायबॅक कर यासह एकूण रक्कम सुमारे 1,048 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

पेटीएम शेअर्सची इश्यू किंमत 2,150 रुपये होती. त्याची सूची 18 नोव्हेंबर 2021 रोजी सुमारे 10% च्या सवलतीवर 1,950 रुपयांमध्ये झाली. 13 डिसेंबर 2022 रोजी हा शेअर रु.539.50 वर बंद झाला. म्हणजेच, हा शेअर अजूनही इश्यू किमतीपेक्षा 70% पेक्षा कमी आहे.

शेअर बायबॅक म्हणजे काय?

शेअर बायबॅकमध्ये कंपन्या लोकांकडून त्यांचे स्वतःचे शेअर्स परत विकत घेतात. सहसा कंपन्या शेअर बायबॅकमध्ये सध्याच्या शेअरच्या किमतीला प्रीमियम देतात. कंपन्यांनी त्यांचे शेअर्स परत विकत घेण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या भागधारकांसाठी मूल्य निर्माण करणे.

कंपनी शेअर्सच्या किंमतीत कशी वाढी होईल यासाठी प्रयत्न करत असते. बायबॅकमध्ये कंपनी कोणत्याही भागधारकाला त्यांचे शेअर्स विकण्यास भाग पाडू शकत नाही.

पेटीएमचे बायबॅक त्याच्या शेअर्सला चालना देण्यासाठी आणले जात आहे, जे चालू वर्षात 60 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत आणि IPO किंमतीपेक्षा 75 टक्क्यांनी खाली आहेत. त्याच वेळी, कंपनी आपल्या गुंतवणूकदारांचा फायदा होण्यासाठी बायबॅक देखील आणत आहे.

खरेतर बायबॅकला शेअर खरेदी ऑफर असेही म्हणतात. ज्या अंतर्गत कंपन्या त्यांचे शेअर्स शेअरधारकांकडून परत विकत घेतात. यामध्ये बायबॅक टेंडर ऑफर आणि ओपन मार्केट ऑफर असे दोन प्रकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT