Pension scheme
Pension scheme google
अर्थविश्व

Pension scheme : या योजनेत पैसे गुंतवल्यास मिळेल दरमहा ९ हजार रुपये पेन्शन

नमिता धुरी

मुंबई : आधुनिक काळात, प्रत्येकाला अशा ठिकाणी गुंतवणूक करायची आहे, जिथे पैसाही सुरक्षित असेल आणि भविष्यात नफाही मिळू शकेल. जर तुमच्याकडे कोणतेही काम नसेल आणि तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ दिला जाईल. तुम्हाला या योजनेत थोडी गुंतवणूक करावी लागेल, त्यानंतर पेन्शन दिली जाईल. योजनेत सहभागी होण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

ही योजना मोदी सरकारने २६ मे २०२० रोजी सुरू केली होती. या योजनेचा भाग होण्यासाठी, तुम्ही ३१ मार्च २०२३ पर्यंत आरामात गुंतवणूक करू शकता. ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे लोक मासिक किंवा वार्षिक पेन्शन योजना निवडू शकतात.

प्रधानमंत्री वय वंदना योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. यात गुंतवणुकीवर दरमहा पेन्शन देण्याची तरतूद आहे. ही योजना भारत सरकारने आणली असून भारतीय आयुर्विमा महामंडळ चालवत आहे.

वयाची ६० वर्षे ओलांडलेले लोक जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत आरामात गुंतवणूक करू शकतात. गुंतवणुकीची मर्यादा ७.५ लाख रुपये निश्चित करण्यात आली होती, ती आता दुप्पट करण्यात आली आहे. इतर योजनांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत जास्त व्याज मिळते. ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक ही पेन्शन योजना निवडू शकतात.

दरमहा एवढी पेन्शन मिळेल

तुम्हालाही प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्यात १५ लाख रुपये गुंतवावे लागतील. या योजनेअंतर्गत तुम्हाला 7.40 टक्के वार्षिक व्याज देखील मिळेल. त्यानुसार, गुंतवणुकीवर वार्षिक व्याज 111,000 रुपये असेल.

जर ते 12 महिन्यांत विभागले गेले तर 9250 रुपयांची रक्कम तयार होते, जी तुम्हाला मासिक पेन्शन म्हणून मिळेल. या योजनेत तुम्हाला मासिक 1,000 रुपये पेन्शन मिळवायचे असेल तर तुम्हाला 1 लाख 50 हजार रुपये गुंतवावे लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RR vs PBKS Live Score: संजू सॅमसनने जिंकला टॉस! राजस्थान-पंजाबने प्लेइंग-11 मध्ये केले मोठे बदल

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

Nashik Fraud Crime : दिले 5 लाख, उकळले 18 लाख! अवैध सावकारीचा आणखी एक गुन्हा दाखल

Rohit Sharma: 'मी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार झालो, तेव्हा...', रोहितनं नेतृत्व अन् निवृत्तीवर केलं मोठं भाष्य

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT