Petrol-Diesel Prices  esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दराबाबत ग्राहकांना दिलासा कायम; जाणून घ्या आजची किंमत

तेल कंपन्यांनी सलग 11व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price Updates: तेल कंपन्यांनी सलग 11व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. 21 मे रोजी सरकारने तेलावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात झाली. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर अनेक राज्यांनीही व्हॅट कमी केला.

वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलचे 8 रुपये आणि डिझेलचे दर 6 रुपये कमी झाल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

देशातील प्रमुख महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर-

  • दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

  • मुंबई- पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

  • चेन्नई- पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोलचे दर-

  • नोएडा- पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर

  • लखनौ- पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

  • जयपूर- पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर

  • तिरुअनंतपुरम- पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर

  • पोर्ट ब्लेअर- पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर

  • पाटणा- पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर

  • गुरुग्राम- 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

  • बेंगळुरू- पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

  • भुवनेश्वर- पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

  • चंदीगड- पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर

  • हैदराबाद- पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लिटर होती, तर डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर विकले जात होते. तेव्हापासून आतापर्यंत अनेकवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाले आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडू लागल्या. 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 10 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र केंद्र सरकारच्या पुढाकाराने 21 मे रोजी पुन्हा एकदा लोकांना दिलासा मिळाला.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT