Petrol-Diesel Prices Reduced in Maharashtra esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलवरून राजकारण सुरुच; जाणून घ्या आजचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price Today, 26 May, 2022: सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. देशात आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपयांना विकले जात आहे.

याशिवाय इतर महानगरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये तर डिझेल 97.28 रुपये दराने विकले जात आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपयांवर स्थिर आहे, तर डिझेल 94.24 रुपयांना विकले जात आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता बद्दल बोलायचे झाले तर येथे एक लिटर पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून जनतेला दिलासा दिला होता. पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी उत्पादन शुल्क कमी करण्यात आले आहे. यानंतर सर्व राज्यांमध्ये तेलाच्या किमती कमी झाल्या.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर-

दिल्ली 96.72/ 89.62

मुंबई 111.35/ 97.28

चेन्नई 102.63/ 94.24

कोलकाता 106.03/ 92.76

केंद्र सरकारने कर कपात केल्यानंतर विविध राज्यांनीही जनतेला दिलासा दिला. केरळ, राजस्थान आणि महाराष्ट्र सरकारने व्हॅट कमी केला होता. महाराष्ट्र सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.08 रुपये आणि डिझेलच्या दरात 1.44 रुपयांची कपात केली आहे. केरळ सरकारने पेट्रोलवर २.४१ रुपये आणि डिझेलवर १.३६ रुपयांची कपात केली होती.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT