HPCL Recruitment 2022 esakal
अर्थविश्व

Petrol Diesel Prices: राज्यात 'या' ठिकाणी देशातील सर्वात महाग पेट्रोल; जाणून घ्या

तेल कंपन्यांनी ६ एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ केली होती.

सुरज सकुंडे

Petrol Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले असून एका महिन्यापासून त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेल कंपन्यांनी ६ एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ केली होती.

देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत. देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी येथे असून तेथे एक लिटर पेट्रोलची किंमत 123.47 रुपये आहे. त्याचप्रमाणे, सर्वात स्वस्त पेट्रोल अंदमान आणि निकोबारमध्ये उपलब्ध आहे जिथे एका लिटरची किंमत 91.45 रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि मुंबईत 120.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर:

  • दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर

  • मुंबई पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर

  • चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर

इतर प्रमुख शहरांमधील भाव-

  • नोएडामध्ये पेट्रोल 105.47 रुपये आणि डिझेल 97.03 रुपये प्रति लिटर

  • लखनऊमध्ये पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर

  • पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर

  • पटणात पेट्रोल 116.23 रुपये आणि डिझेल 101.06 रुपये प्रति लिटर

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT