रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत.
Petrol-Diesel Price Today 25 March : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान (Russia-Ukraine War) भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. चार दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळं (Petrol Diesel Hike Today) जनता महागाईनं त्रस्त झालीय. पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आलीय. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय राजधानीत 80 पैशांच्या वाढीनंतर, एक लिटर पेट्रोलची किंमत 97.81 रुपयांवर पोहोचलीय. तर, डिझेल 89.07 रुपयांना विकलं जात आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नव्हती. यानंतर गेल्या मंगळवारपासून तेलाच्या दरात वाढ होऊ लागलीय. दोन दिवस भाव वाढवल्यानंतर, तेल कंपन्यांनी तिसर्या दिवशी दरात कोणतीही वाढ केली नव्हती. मात्र, आता चौथ्या दिवशी तिसऱ्यांदा तेलाच्या दरात पुन्हा 80 पैशांनी वाढ झालीय.
IOCL च्या म्हणण्यानुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 112.51 रुपये आणि डिझेलची किंमत 96.70 रुपये प्रति लिटर झालीय. याशिवाय कोलकात्यात पेट्रोल 107.18 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.22 रुपयांना विकलं जात आहे. तसंच चेन्नईमध्ये आज पेट्रोल 103.67 रुपये आणि डिझेल 93.71 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, 22 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत जे बदल करण्यात आले होते, ते 137 दिवसांनी करण्यात आले होते. त्यापूर्वी देशात इंधन दर स्थिर होते.
शहरं पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
मुंबई 112.51 96.70
दिल्ली 97.81 89.07
चेन्नई 103.67 93.71
बंगळुरु 103.11 87.37
कोलकता 107.18 92.22
भोपाळ 109.85 93.35
रांची 100.96 94.08
चंदिगढ 96.59 83.12
पाटना 108.37 93.49
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.