Petrol-Diesel Price Sakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: काश्मीर ते कन्याकुमारी काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर; जाणून घ्या

आज राष्ट्रीय बाजारपेठेत वाहन इंधनाच्या (पेट्रोल-डिझेल) किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price Updates, 28 May 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी आज (शनिवार) सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. 28 मे 2022 रोजीही राष्ट्रीय बाजारपेठेत वाहन इंधनाच्या (पेट्रोल-डिझेल) किमतीत कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. याआधी 21 मे रोजी मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेलवरील 6 रुपयांनी कमी केले होते. त्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

भारतीय तेल कंपनी IOCL च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज, 28 मे 2022 रोजी पेट्रोलची किंमत 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत 111.35 रुपये प्रति लिटर आहे.

प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घेऊया

शहराचे नाव पेट्रोल रु. पेट्रोल प्रति लिटर रु. प्रति लिटर

  • दिल्ली 96.72 89.62

  • मुंबई 111.35 97.28

  • चेन्नई 102.63 94.24

  • कोलकाता 106.03 92.76

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT