Petrol-diesel prices rising sakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

पेट्रोल-डिझेलच्या दराच्या बाबतीत आज आठवड्याच्या पाचव्या दिवशी सर्वसामान्यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दराच्या बाबतीत आज आठवड्याच्या पाचव्या दिवशी सर्वसामान्यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. गेल्या आठवड्यात बुधवारी पेट्रोलचे दर 85 पैशांनी तर डिझेलचे दर 75 ते 85 पैशांनी वाढले होते. सलग 9 दिवस कंपन्यांनी दर वाढवलेले नाहीत, मात्र गेल्या 25 दिवसांबद्दल बोलायचे झाले तर पेट्रोलचे दर 10 रुपयांनी वाढले आहेत. चला तर जाणून घेऊया आजचे दर..

देशातील प्रमुख महानगरांतील दरः

दिल्ली- तेल विपणन कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज दिल्लीत पेट्रोलची किंमत आता प्रति लीटर 105.41 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 96.67 रुपये आहे.

मुंबई- मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नई- चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 110.85 रुपये आणि 100.94 रुपये प्रति लिटर आहेत.

कोलकाता- कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 115.12 रुपये आहे. कोलकात्यात डिझेलचा दर १००.९४ रुपये प्रतिलिटर होता.

10 रुपयांपर्यंत वाढला भाव-

22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. गेल्या 25 दिवसांत आतापर्यंत 14 वेळा दर वाढवण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढ झाली आहे.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT