Petrol Diesel Rate  esakal
अर्थविश्व

Petrol Diesel Prices: मुंबईत पेट्रोल 120 रुपयांच्या पुढे; जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले.

सकाळ डिजिटल टीम

Petrol Diesel Prices Today: सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही कंपन्यांनी दरात कपात केलेली नाही. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर अजूनही 120.51 रुपये आहे.

तेल कंपन्यांनी ६ एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ केली होती. तेव्हापासून देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतीत लक्षणीय घट झाली असली तरी कंपन्यांनी किमतींवर कोणताही दिलासा दिलेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे.

देशातील चार प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर:

दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर

मुंबई पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर

चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर

कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT