Petrol-Diesel Price  esakal
अर्थविश्व

Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर भडकले; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? जाणून घ्या आजची किंमत

शनिवारी सकाळी ब्रेंट क्रूड ऑयल प्रति बॅरल 120 डॉलरच्या जवळ व्यवहार करत होते.

सकाळ डिजिटल टीम

Petrol Diesel Prices: सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. शनिवारी सकाळी ब्रेंट क्रूड ऑयल प्रति बॅरल 120 डॉलरच्या जवळ व्यवहार करत होते. कच्च्या तेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजपर्यंतच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7.50 रुपयांनी स्वस्त झाले होते. दरम्यान, कच्च्या तेलाने पुन्हा कंपन्यांवर किमती वाढवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

  • दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबई पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर

  • चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बातम्या पेरून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलेला, आता घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्याबद्दल खोटं पसरवतोय; धंगेकरांची आणखी एक पोस्ट

IND vs AUS, 2nd ODI: भारतीय संघाने सलग १७ वा टॉस हरला; प्लेइंग-11 मध्ये कुलदीपला संधी नाहीच, जाणून घ्या कसे आहेत दोन्ही संघ

Baby Care After Diwali: दिवाळीनंतर लहान बाळांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या काही खास सोप्या टिप्स!

रितेश जेनिलियाची यंदाची दिवाळी लातूरमध्ये नाहीतर मुंबईत, नवऱ्याने मुलासोबत स्वत: केल बायकोचं औक्षण

Panchang 24 October 2025: दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT