state government reduced the VAT petrol and diesel mumbai Sakal
अर्थविश्व

Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले; पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव पुन्हा गगनाला भिडले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price Updates Today: जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव पुन्हा गगनाला भिडले आहेत. सोमवारी सकाळी, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 120 डॉलरजवळ पोहोचली आहे. दरम्यान सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी देखील पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीच्या दबावातही कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत बदल केलेला नाही. आज सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 119.8 डॉलर होती, तर WTI प्रति बॅरल 115.6 डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीच्या दबावानंतरही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते, तर राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली होती. यामुळे इंधनाच्या दरात मोठी घसरण झाली.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • मुंबई पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर

  • चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

या शहरांमधील नवे दर-

  • नोएडामध्ये पेट्रोल 96.79 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • पाटणामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 19.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT