Check Today's Petrol Diesel Price Updates  esakal
अर्थविश्व

Petrol Diesel Prices: जागतिक बाजारात कच्चं तेल महागलं; पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता

जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 110 डॉलरच्या वर पोहोचल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता बळावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Petrol Diesel Prices Today : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. दिल्ली, मुंबईसह देशातील चार महानगरे आणि प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

वास्तविक, मुख्य आर्थिक सल्लागारांनी गेल्या महिन्यात एका निवेदनात म्हटले होते की, जोपर्यंत क्रूडची किंमत प्रति बॅरल डॉलर 110 पेक्षा कमी आहेत, तोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत. कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलरच्या वर राहिल्यास त्याचा भार सरकार, तेल कंपन्या आणि ग्राहकांना मिळून उचलावा लागेल. अशा परिस्थितीत आज जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 110 डॉलरच्या वर पोहोचल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता बळावली आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर

मुंबई पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर

चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर

कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT