petrol rate 
अर्थविश्व

सर्वसामान्यांना दिलासा, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेल दर

सकाळ वृत्तसेवा

Petrol and Diesel Price in India Latest Updates: सतत वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडलेय. खाद्य तेलापासून ते सर्वसामान्याच्या खाद्यातील डाळीपर्यंत महागाई जाणवू लागली आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य हतबल झाले आहेत. अशातच सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. बुधवारी पेट्रोल आणि डेझिलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नाही. मंगळवारी पेट्रोल देशभरात 10 ते 12 पैशांनी महागलं होतं. तर डिझेल 75 पैशांनी महागलं होतं. 24 तारखेपासून 28 तारखेपर्यंत चार वेळा डिझेलच्या दरांत वाढ झाली होती.

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

राजधानी दिल्ली :

पेट्रोल – 101.39 रुपये प्रति लीटर

डिझेल - 89.57 रुपये प्रति लीटर

मुंबई :

पेट्रोल – 107.47 रुपये प्रति लीटर

डिझेल – 97.21 रुपये प्रति लीटर

कोलकाता:

पेट्रोल – 101.87 रुपये प्रति लीटर

डिझेल – 92.62 रुपये प्रति लीटर

चेन्नई:

पेट्रोल – 99.15 रुपये प्रति लीटर

डिझेल – 94.17 रुपये प्रति लीटर

बंगळुरु:

पेट्रोल – 104.92 रुपये प्रति लीटर

डिझेल – 95.06 रुपये प्रति लीटर

भोपाळ:

पेट्रोल – 109.85 रुपये प्रति लीटर

डिझेल – 98.45 रुपये प्रति लीटर

लखनऊ:

पेट्रोल- 98.51 रुपये प्रति लीटर

डिझेल - 89.98 रुपये प्रति लीटर

पाटना:

पेट्रोल – 104.04 रुपये प्रति लीटर

डिझेल –95.70 रुपये प्रति लीटर

चंडीगढ़ :

पेट्रोल –97.61 रुपये प्रति लीटर

डिझेल – 89.31 रुपये प्रति लीटर

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 3 वर्षांतील विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. ब्रेंट क्रूडचे दर 80 डॉलर प्रति बॅलरच्या आसपास पोहचले आहे. त्यामुले दसऱ्यापर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपल्या शहरात काय आहेत भाव? (How to check petrol-diesel price)

पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) आपण SMS च्या द्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, आपल्याला RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 नंबर वर SMS पाठवायचा आहे. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा आहे. हा कोड आपल्याला IOCL च्या वेबसाईटवरुन मिळेल.

दररोज सकाळी सहा वाजता बदलतात किंमती (how to decide price of petrol and diesel)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती दररोज बदलत असतात. त्यानुसार दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात. सकाळी सहा वाजल्यापासून नव्या किंमती लागू केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टींसह या पेट्रोलचे भाव जवळपास दुप्पट होतात. परकीय चलनांसहित आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती काय आहेत या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किंमतींमध्ये बदल होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT