Check Today's Petrol Diesel Price Updates esakal
अर्थविश्व

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; मुंबईत अजूनही पेट्रोल 110 रुपयांवर

जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

सकाळ वृत्तसेवा

दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये सलग तीन महिने दर स्थिर आहेत.

Petrol-Diesel Prices : सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल केला नाही. दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये सलग तीन महिने दर स्थिर आहेत. देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेल्यानंतर मोदी सरकारने 4 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी केले होते. कंपन्यांनी चार नोव्हेंबरपासून किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. (Check Today's Petrol Diesel Price Updates)

सरकारने 15 जून 2017 पासून बाजारात तेलाच्या किमती लागू केल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या किंमती आता दररोज निश्चित केल्या जातात. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. यामध्ये देशातील चारपैकी तीन महानगरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात 10 पैशांनी वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोल (Petrol) 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. मुंबईत (Mumbai) आज पेट्रोल (Petrol) 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 94.14 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. पुण्यात (Pune) आज पेट्रोल (Petrol) 109.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 92.50 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

-परभणी- 112.49-95.17 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- नागपूर- 110.10-92.90 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

दररोज 6 वाजता बदलतात किंमती

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT