petrol, diesel, diesel prices, petrol prices, fuel price hike  
अर्थविश्व

Petrol Diesel Prices Today: इंधन दरवाढीला ब्रेक लागेना; पुन्हा उडला भडका

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: इंधनाच्या वाढत्या किंमती दिवसागणिक उसळी घेताना दिसत आहेत. सलग 11 व्या दिवशी दिवशी पेट्रोल- डिझेलच्या  दरात (Petrol Diesel Prices) वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. याठिकाणी पेट्रोलच्या किंमती या 31 ते 33 पैशांनी वाढली. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीने नव्वदी पार केली. तेल वितरण कंपनी इंडियन ऑयल कॉरपोरेशनच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये शुक्रवारी  31 पैसे दर वाढ झाल्याने पेट्रोल 90.19 रुपये प्रति लिटरवर पोहचले. डिझेलच्या किंमती 33 पैशांनी वाढून  80.60 रुपये प्रति लीटर वर गेला आहे.   

अन्य शहरामध्येही पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील पेट्रोल दर 96 रुपये प्रति लिटरच्या पार गेला असून  याठिकाणी पेट्रोल 96.62 रुपये प्रति लिटर असून डिझेल 87.67 रुपये लीटरवर पोहचले आहे.  पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील पेट्रोल दर 91.41 रुपये प्रति लीटर इतका असून डिझेल 84.19 रुपये प्रति लिटरवर पोहचले.  चेन्नईतील  पेट्रोलचे दर 92 रुपयेहून अधिक झाले आहेत. याठिकाणी पेट्रोल 92.25 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती 85.63 रुपये प्रति लिटर झाले आहे. मध्य प्रदेशमधील अनूपपुर येथे गुरुवारी पेट्रोलने शंभरी पार केली होती.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील पेट्रोलवरील सर्वाधिक अधिभार हा राजस्थामध्ये आकारण्यात येतो. त्यानंतर मध्य प्रदेशचा नंबर लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी वाढत्या इंधनाला विरोधक कारणीभूत असल्याचा उल्लेख केला होता. यापूर्वीच्या सरकारने ऊर्जा आयातीवर योग्य काम केले असते तर आज देशातील सामान्य नागरिकांना इंधन वाढीसारख्या समस्येला सामोरे जावे लागले नसते, असे मोदींनी म्हटले होते.  2019-20 मध्ये भारताने देशांतर्गत मागणीसाठी 85 टक्के तेल आणि 53 टक्के गॅस आयात केलाय, अशी माहितीही मोदींनी दिली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : एमपीएससी सचिवांना काळं फासल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT