Check Today's Petrol Diesel Price Updates sakal media
अर्थविश्व

Petrol Rate : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ! जाणून घ्या नवे दर

तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घ्या

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices) वाढ सुरूच ठेवली आहे. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांची वाढ झाली होती. जोपर्यंत तोटा भरून निघत नाही तोपर्यंत कंपन्या इंधनाचे दर वाढवू शकतात. (Check Today's Petrol Diesel Price Updates)

तेल कंपन्यांनी राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांची वाढ केली आहे. दिल्लीत आता पेट्रोल 104.61 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे, तर डिझेल सुमारे 96 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबईत (Mumbai)पेट्रोल 119.67 रुपये तर डिझेल 104 रुपयांच्या जवळपास विक्री करत आहे. कंपन्यांनी 15 दिवसांत 13 वेळा भाववाढ केली असून आतापर्यंत 9.40 रुपयांनी भावात वाढ झाली आहे.

इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी (Indian Petroleum Marketing Company) इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 5 एप्रिल 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 119.67 रुपये झालाय,तर डिझेलचा दर 103.92 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय. राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलताहेत. देशातील चार महानगरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. दिल्लीशिवाय इतर सर्व महानगरांमध्ये 100 रुपयांच्या पुढं डिझेल विकलं जात आहे.

कोणत्या दिवशी पेट्रोलचे दर किती वाढले?

तारीख किती रुपयांनी वाढलं

- 22 मार्च 80 पैसे

- 23 मार्च 80 पैसे

- 25 मार्च 80 पैसे

- 26 मार्च 80 पैसे

- 27 मार्च 50 पैसे

- 28 मार्च 30 पैसे

- 29 मार्च 80 पैसे

- 30 मार्च 80 पैसे

- 31 मार्च 80 पैसे

- 02 एप्रिल 80 पैसे

- 03 एप्रिल 80 पैसे

- 04 एप्रिल 40 पैसे

- 05 एप्रिल 80 पैसे

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT