Petrol-diesel prices update sakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे दर

22 मार्च ते 6 एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये मोठी भाववाढ पहायला मिळाली होती.

सकाळ डिजिटल टीम

देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर 22 मार्चपासून इंधनाचे दर वाढवले होते. 22 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत कंपन्यांनी प्रति लिटर 10 रुपयांची वाढ केली. 6 एप्रिल रोजी कंपन्यांकडून शेवटची वाढ 80 पैसे प्रति लिटर होती. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमती स्थिर आहेत.

देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांकडून आज इंधनाचे दर जारी करण्यात आले आहेत. आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol diesel price) स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग गेल्या पंधरा दिवसांपासून इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (petrol diesel prices update today)

एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे दर (Crude oil price)वाढू लागले आहेत. मात्र भारतात पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol Diesel rate today) स्थिर आहेत. 22 मार्च ते 6 एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये मोठी भाववाढ पहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये लिटर आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये असून, डिझेल प्रति लिटर 104.77 रुपये लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आहे, तर एक लिटर डिझेलचा दर 99.83 रुपये लिटर आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT