पेट्रोल, डिझेल महागले
पेट्रोल, डिझेल महागले  
अर्थविश्व

पेट्रोल शंभरी पार, डिझेल ९०.१७ रूपये लिटर

उमेश वाघमारे

जालना : कोरोना संसर्ग (Coroan Infection) रोखण्यासाठी लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे जनसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. यात भर म्हणून लाॅकडाउनदरम्यान (Lock Down) महागाईचा आलेख (Inflation Graph) वाढता राहिला आहे. त्यात सोमवारी (ता.१७) जालन्यात पेट्रोल शंभरी पार झाले आहे. तर डिझेल ही ९०.१७ रूपये प्रतिलिटर झाले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या जालनेकरांच्या (Petrol Price In Jalna) खिशाला पेट्रोल व डिझेल दरवाढाचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे.(Petrol Price Crossed 100 Rupees In Jalna, Diseal At 90)

मागील दीड वर्षांपासून देशासह राज्यात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरू आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने गतवर्षी लाॅकडाउन लागू केले होते. तर राज्य शासनाने गतवर्षीसह यंदाही ता.१५ एप्रिलपासून राज्यात लाॅकडाउन लागू केले आहे. या लाॅकडाउनमध्ये असंख्य नागरिकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेकांचे रोजगार ही गेले आहेत. या महामारीत महागाईचा आलेख खाली आणूण शासन सामान्य नागरिकांना दिलास देईल अशी अपेक्षा होती.

मात्र, मागील दीड वर्षांपासून आर्थिक संटकात असलेल्या जनसामान्यांसाठी महागाईचा आलेख नियंत्रणात ठेवण्यास केंद्रासह राज्य शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे खाद्यतेल, घरगुती गॅस, डाळी, पेट्रोल दरवाढ ही लाॅकडाउनदरम्यान झाली आहे. या लाॅकडाउनमध्ये कमाईचे साधन गमावल्यानंतर महागाईचे चटे सामान्य नागरिकांना बसत आहेत. त्यात सोमवारी (ता.१७) जालना शहरात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १००.५ रूपये झाले. तर डिझेलचे दर प्रतिलिटर ९०.१७ रूपये झाले. त्यामुळे लाॅकडाउनमध्ये आर्थिक संकाटात आलेल्या सामान्य नागरिकांच्या डोक्यावर पेट्रोल व डिझेल दरवाढीचे ओझे लादले गेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT