केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी Sakal
अर्थविश्व

इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलचे दर सर्वात कमी : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी

सध्या देशात इंधन दरांनी महागाईचा उच्चांक गाठला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशात इंधन दरांनी (Fuel Price) महागाईचा उच्चांक गाठला आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलच्या दराने गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच चाप बसलाय. त्यामुळे प्रत्येक जण इंधन बचत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसताहेत.

मात्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की, सध्याची जागतिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती पाहता भारतातील पेट्रोलचे दर इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहेत. 2021-2022 या कालावधीत भारतात पेट्रोलच्या किंमती केवळ दोन टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र, या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर किमतीत मोठी वाढ झाली.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

गुरुवारी प्रश्नोत्तरा दरम्यान प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, केंद्राने उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी व्हॅट कमी केला होता, तर काही विरोधी-शासित राज्यांनी तसे केले नाही. आज, भारतातील पेट्रोलच्या किमती कदाचित सर्वात कमी आहेत.

पुरी म्हणाले, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि झारखंडने त्यांच्या करात कपात केलेली नाही. किंमत वाजवी पातळीवर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये दोनदा उत्पादन शुल्क कमी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT