petrol rate 
अर्थविश्व

Petrol Price Today - सप्टेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेल झालं स्वस्त; आजचे दर किती?

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. यात अजून भर पडली आहे ती, जागतिक बाजारात उतरत असलेले कच्च्या तेलाचे भावामुळे. आंतरराष्ट्रीय बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात ब्रेंट क्रुड तेलाच्या किंमती घसरल्या (Crude Oil Cheaper) आहेत. मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमती 7 टक्क्यांनी कमी झाल्या होत्या. जरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असल्या तरी डोमेस्टीक मार्केटमध्ये त्याचा परिणाम दिसला नाही.

 भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी  (Government oil companies-HPCL,BPCL IOC) आजही डिझेलचे भाव कमी केल्याचे सांगितले आहे. डिझेलच्या किंमती 16 पैसे प्रतिलिटर कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे देशात पेट्रोलचे भाव मागील 2 दिवसांपासून स्थिर आहेत. शनिवारी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 81.06 रुपये होते. तर आता डिझेलच्या नव्या किंमती 70.09 रुपये प्रतिलिटर आहेत. या महिन्यातील 10 तारखेपासून पेट्रोल काही प्रमाणात स्वस्त होत गेलंय. 22 तारखेपर्यंत पेट्रोलचे दर 1.02 रुपयांनी कमी झाले होते. तर 3 सप्टेंबरपासून डिझेलही स्वस्त होत जाऊन त्यात 2.62 रुपयांची घट दिसून आली. 

देशातील मुख्य शहरांतील पेट्रोल-डिझेलचे प्रतिलिटर दर-
दिल्ली- पेट्रोल(81.6), डिझेल(70.94)
मुंबई- पेट्रोल(87.74), डिझेल(77.36)
कोलकाता- पेट्रोल(82.59), डिझेल(74.46)
चेन्नई- पेट्रोल(84.14), डिझेल(76.40)
नोएडा- पेट्रोल(81.58), डिझेल(71.40)
लखनौ- पेट्रोल(84.18), डिझेल(75.07)
पटना- पेट्रोल(83.73), डिझेल(76.50)
चंदीगड- पेट्रोल(77.99), डिझेल(75.07 

पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज बदलत असतात. सकाळी 6 वाजता त्यांचे नवीन दर येत असतात. 


(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT