Message esakal
अर्थविश्व

PIB फॅक्ट चेक : 15000 रुपये अन् सरकारी नोकरी; जाणून घ्या, संपूर्ण सत्य?

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सरकारी योजनेत पैसे देण्याचा दावा केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सरकारी योजनेत पैसे देण्याचा दावा केला जात असून, बनावट पत्राद्वारे पीएम-वाणी योजनेअंतर्गत 650 रुपये भरून वाय-फाय पॅनेल, 15,000 भाडे आणि नोकरी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. दरम्यान, या योजनेची सत्यता जाणून घेण्यासाठी, पीआयबीने तथ्य तपासणी केली आहे. ज्यामध्ये सरकारी योजनेच्या नावाखाली नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू काही भामट्यांनी सुरू केला आहे. (PIB Fact Check On PM Wani Scheme)

पीआयबीने केले ट्वीट

दरम्यान, मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या मेसेजनंतर पीआयबीने ट्वीट करत नागरिकांना अशा स्वरुपाच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच बनावट पत्राद्वारे पीएम-वाणी योजनेअंतर्गत 650 रुपये भरून वाय-फाय पॅनेल, 15,000 भाडे आणि नोकरी अशा कोणत्याही देयकाची मागणी दूरसंचार विभागाकडून केली जात नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पीएम वाणीशी संबंधित योग्य माहितीसाठी https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1679342 या संकेत स्थळावर भेट देण्यास सांगण्यात आले आहे.

खोटे मेसेज शेअर करू नका

पीआयबीने केलेल्या तथ्य तपासणीनंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारा हा संदेश पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून प्रत्येकाने सावध राहावे, असे पीआयबीने म्हटले आहे. तसेच PIB ने लोकांना असे मेसेज फॉरवर्ड न करण्यास सांगितले आहे. अशा संदेशांद्वारे दिशाभूल करून, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसा धोक्यात आणत आहात त्यामुळे सावध राहण्याचे आवाहन पीआयबीने नागरिकांना केले आहे.

कोणीही करू शकतो फॅक्ट चेक

दरम्यान, कोणत्याही योजनेसंदर्भातील मेसेज तुम्हाला प्राप्त झाला असेल आणि त्याबाबत तुम्हाला शंका असेल तर, तुम्हीदेखील PIB द्वारे तथ्य तपासणी करू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT