PM Awas Yojana sakal
अर्थविश्व

PM Awas Yojana: PM आवास योजनेबाबत सरकारने केली मोठी घोषणा!

या घोषणेनंतर लाखो लोकांना मोठा फायदा होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

PM Awas Yojana: पंतप्रधान आवास योजनेबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G योजना) 2024 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. सरकारने पीएम आवास योजना- ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी पक्की घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत सुमारे 2 कोटी पक्की घरे बांधण्यात आली आहेत. परंतु अजूनही अशी अनेक कुटुंबे शिल्लक आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. हे लक्षात घेऊन 2024 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचा फायदा लाखो ग्रामस्थांना होणार आहे.

हेही वाचा : विमा पाॅलिसींचे डी-मॅट पाॅलिसीधारकांनाच पोहचवेल नुकसान?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी केंद्र सरकारचा एकूण खर्च 1,43,782 कोटी रुपये असेल आणि यामध्ये नाबार्डला कर्जाच्या व्याजासाठी 18,676 कोटी रुपयांचा समावेश आहे. या योजनेद्वारे, सरकार 90 टक्के आणि 10 टक्के या आधारावर अप्रगत राज्यांना पैसे देते. तर उर्वरित 60 टक्के आणि 40 टक्के केंद्र आणि राज्य अशी विभागणी आहे. तर केंद्रशासित प्रदेशात सरकार 100 टक्के पैसे खर्च करते.

सरकार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपये देते, जे इमारतीच्या बांधकामाव्यतिरिक्त दिले जातात. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पक्के घर, पाणी, वीज, शौचालये देण्याचा शासनाचा संकल्प पूर्ण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Seema Kohali: सीमा कोहली; स्थलांतर, स्मृती आणि आध्यात्मिकतेतून घडलेले सीमाचे कलाविश्व

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT