pm kisan pm kisan
अर्थविश्व

PM kisan चे तुम्ही लाभार्थी आहेत की नाही?; इथे घ्या जाणून

या योजनेअंतर्गत 1 दिवसात भरली जाणारी ही सर्वात मोठी रक्कम आहे. जर अर्जामध्ये उशीर किंवा त्यात काही चूका असतील तर त्याचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे तुमच्या अकाउंटचे स्टेटस चेक करून घ्या

प्रमोद सरवळे

या योजनेअंतर्गत 1 दिवसात भरली जाणारी ही सर्वात मोठी रक्कम आहे. जर अर्जामध्ये उशीर किंवा त्यात काही चूका असतील तर त्याचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे तुमच्या अकाउंटचे स्टेटस चेक करून घ्या

औरंगाबाद: PM Kisan Samman Nidhi: आज किसान सन्मान निधी अंतर्गत 9 वा हप्ता जारी केला गेला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे 8 हप्ते देण्यात आले आहेत. देशभरातील 9.75 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत 1 दिवसात भरली जाणारी ही सर्वात मोठी रक्कम आहे. जर अर्जामध्ये उशीर किंवा त्यात काही चूका असतील तर त्याचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे तुमच्या अकाउंटचे स्टेटस चेक करून घ्या. जरी तुम्हाला एखाद्या माहितीअभावी हा हप्ता मिळाला नाही तर सरकारने यावरही उपायही सांगितले आहेत.

केंद्र सरकारने कमी जमीन असणारे आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जात आहेत. यासाठी सर्व माहिती pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे 8 हप्ते मिळाले आहेत. आता नववा हप्ताही शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा केला आहे. मागील वेळेस 14 मे 2021 रोजी 9.5 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या अकाउंटवर 19 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते.

नाव यादीत आहे की नाही कसं पहायचं?

तुम्ही या योजनेसाठी नोंदणी केली असेल आणि तुम्हाला पुढला हप्ता मिळेल की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही पीएम किसान पोर्टलद्वारे (https://pmkisan.gov.in) ही माहिती मिळवता येऊ शकते. त्याचबरोबर, जर तुमचे नाव अद्याप नोंदणीकृत नसेल तर तुम्हाला तक्रार देखील करता येऊ शकते.

  • पहिल्यांदा https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावा.

  • त्यानंतर वेबसाईट उघडल्यानंतर मेन्यू बारमध्ये पहा तिथं तुम्हाला ‘फार्मर कार्नर’ ऑप्शन दिसेल त्याच्यावर जावा.

  • नंतर 'लाभार्थी सूची' यावर क्लिक करा.

  • नंतर तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गावाचे नाव अशी माहिती भरा.

  • त्यानंतर Get Report वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल.

  • ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांचे नाव यात आहे का नाही हे पाहता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT