अर्थविश्व

(Video) 'पीएमसी'तील पैसे सुरक्षित; आता काढता येणार 'इतकी' रक्कम

सकाळ डिजिटल टीम

पुणे: आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बॅंकेवर सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेवर "प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन" घेतली असून यापुढे बॅंकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्याशिवाय खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली होती. ही मर्यादा वाढवून आता 10,000 रुपये करण्यात आली आहे.

पीएमसी बॅंकेच्या संदर्भात आरबीआय घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य खातेदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या पैशांच्या भवितव्याविषयी ते साशंक आहेत. मात्र नेमके या प्रकरणात काय झाले आहे. पीएमसी बॅंक आणि आरबीआय यांच्या नेमक्या भूमिका याविषयी सकाळने ज्येष्ठ बॅंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्याशी संवाद साधला. आणि सर्वसामान्यांच्या मनातील विविध प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला.

'पीएमसी बॅंक आर्थिकदृष्ट्या भरभक्कम स्थितीत आहे. बॅंकेतील खातेदारांचे पैसे सुरक्षित असून त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही', असे स्पष्ट मत ज्येष्ठ बॅंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी सकाळशी केलेल्या खास बातचीतमध्ये व्यक्त केले आहे. पीएमसी बॅंक आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील सुसंवादाच्या अभावामुळेच हे झाले असून रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेला एनपीएच्या संदर्भातील तरतूदी करण्यासाठी पुरेसा कालावधी देण्याची आवश्यकता आहे. अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे नफ्यात असणारी बॅंक रातोरात तोट्यात दिसते आहे. मात्र यामुळे बॅंकेवरच्या खातेदारांच्या विश्वासालाच धक्का लागू शकतो. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने एनपीएच्या तरतूदी करण्यासाठी बॅंकेला योग्य वेळ द्यावा. एरवी बॅंकेची आर्थिक कामगिरी उत्तम आहे, असेही अनास्कर पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra GAIL Project: आता वाऱ्यापासून वीज तयार होणार! गेल महाराष्ट्रात मेगा प्रकल्प उभारणार; पवनऊर्जा विस्ताराला बूस्ट मिळणार

Ajit Pawar, DGCA Report आला समोर, आदिती तटकरे थेट बोलल्या...

T20 WC: फखरची साथ अन् फरहानने मोडला विराटचा १२ वर्षे जूना विश्वविक्रम! पाकिस्तानच्या सलामीवीरांनी श्रीलंकेला घरच्या मैदानातच रडवलं

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : ४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

SCROLL FOR NEXT