PNB Q2 profit at Rs 507 cr 
अर्थविश्व

पंजाब नॅशनल बॅंकेचा नफा 507 कोटींवर 

वृत्तसंस्था

मुंबई, ता. 5 (वृत्तसंथा): सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 507.05 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बॅंकेने 4,532.35 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. दुसऱ्या तिमाहीत 'पीएनबी'ला 13,291.92 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. निव्वळ व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात  7.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. ते आता 4,263.84 कोटी रुपयांवर पोचले आहे. 

बँकेच्या ठेवींमध्ये वार्षिक आधारावर 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसऱ्या तिमाहीत बॅंकेने 2,928.90 कोटी रुपयांची तरतूद विविध खर्चासाठी केली आहे.  
जी गेल्यावर्षी याच तिमाहीत केलेल्या तरतुदीपेक्षा 44 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ती 2,023.31 कोटी रुपये होती. बॅंकेचे एकूण थकित कर्जाचे प्रमाण 17.16 टक्क्यांवरून 16.76 टक्क्यांवर आले आहे. तर निव्वळ थकित कर्जाचे प्रमाण 8.90 टक्क्यांवरून 7.65 टक्क्यांवर आले आहे. 

दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात पीएनबीचा शेअर 5.06 टक्क्यांच्या घसरणीसह 64.75 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 29,811 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

Viral Video: IT मॅनेजरची लाखोंची नोकरी सोडली; आता ऑटो चालवून महिला कमावते 60 हजार, कारण ऐकून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT