Mehul-Choksi
Mehul-Choksi 
अर्थविश्व

चोक्‍सीचा ठावठिकाणा द्या!

पीटीआय

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याचा अँटिग्वातील ठावठिकाण्याची माहिती द्यावी, अशी विनंती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अँटिग्वातील तपास यंत्रणांकडे पत्राद्वारे केली आहे. 

मेहुल चोक्‍सी हा या महिन्यात अमेरिकेतून अँटिग्वात गेला असून, तेथे तो स्थानिक पारपत्र मिळवून राहत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सीबीआय’ने अँटिग्वातील यंत्रणांना पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे, की फरारी उद्योगपती मेहुल चोक्‍सी याच्याविरोधात इंटरपोलने नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार त्याच्या हालचाली आणि सध्याचा ठावठिकाणा याची माहिती अँटिग्वातील यंत्रणांनी भारत सरकारला द्यावी. 

‘अँटिग्वा ऑब्झर्व्हर’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, चोक्‍सी याने नोव्हेंबर २०१७ मध्ये अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले होते. त्याने या वर्षी १५ जानेवारीला नागरिकत्वाची शपथ घेतली. आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून मिळालेल्या अहवालानंतर चोक्‍सी याला नागरिकत्व देण्यात आल्याचे अँटिग्वातील यंत्रणांनी सांगितले आहे. 

हिरे व्यापारी मेहुल चोक्‍सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांनी ‘पीएनबी’मध्ये सुमारे २ अब्ज डॉलरचा गैरव्यवहार केला आहे. या गैरव्यवहारात बॅंकेतील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे.

आधीच आखली पलायनाची योजना  
 मेहुल चोक्‍सी याने अतिशय नियोजनपूर्वक विचार करून अँटिग्वाचे नागरिकत्व आधीच स्वीकारले होते. ‘पीएनबी’ गैरव्यवहार उघडकीस येण्याआधी त्याने यासाठी पावले उचलली होती. त्यानुसार तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतातून पळून गेला आणि १५ जानेवारीला त्याने अँटिग्वाच्या नागरिकत्वाची शपथ घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT