IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

Harshal Patel: पंजाब किंग्सचा गोलंदाज हर्षल पटेलला एमएस धोनीला शुन्यावर बाद केल्याने ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.
Harshal Patel | MS Dhoni | IPL 2024
Harshal Patel | MS Dhoni | IPL 2024Sakal

Harshal Patel: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 53 वा सामना रविवारी धरमशाला येथे पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 28 धावांनी विजय मिळवला. मात्र या विजयानंतर पंजाब किंग्सच्या हर्षल पटेलला एमएस धोनीला शुन्यावर बाद केल्याने ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.

धोनी हा लोकप्रिय खेळाडूंपैकी असल्याने त्याला त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. दरम्यान, सध्या धोनी त्याच्या कारकिर्दीतील आयपीएलचा अखेरचा हंगाम खेळत आहे, अशी चर्चा आहे.

त्यामुळे त्याला चालू आयपीएल हंगामात सर्वच स्टेडियममधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे तो फलंदाजीला आल्यानंतर आक्रमक खेळतानाही दिसत आहे.

Harshal Patel | MS Dhoni | IPL 2024
MS Dhoni Video: हर्षल पटेलचा यॉर्कर अन् धोनी 'गोल्डन डक'वर परतला माघारी, यापूर्वी असं कधी झालंय?

मात्र रविवारी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात धोनीला खास काही करता आले नाही. 19 व्या षटकात तो शार्दुल ठाकूरला हर्षल पटेलने त्रिफळाचीत केल्यानंतर 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. मात्र पहिलाच चेंडू खेळत असताना त्याचा हर्षल पटेलने त्रिफळा उडवला. त्यामुळे धोनी गोल्डन डकवरच (पहिल्या चेंडूवर शुन्यावर) बाद होत माघारी परतला.

दरम्यान, धोनीला बाद केल्यानंतर हर्षलनेही फार जोरदार सेलिब्रेशन केले नाही. परंतु, असे असले तरी नेटकऱ्यांकडून मात्र त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. त्याने धोनीला बाद केल्यानंतर काही युजर्सने मजेने काही मीम्स शेअर केले आहे, तर काही युजर्सने त्याला धोनीची विकेट घेतल्याने ट्रोलही केले आहे.

तसेच काहींनी त्याच्याविरुद्ध वाईट शब्दही वापरले आहेत. त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरही काही युजर्सने वाईट पोस्ट करत त्याला ट्रोल केले आहे. एका युजरने तर एक्सवर पोस्ट केली की 'हर्षल तू माहीबरोबर असं का केलं? तू धोनीला गोल्डन डकवर बाद केल्यानंतर तुझ्या कारकि‍र्दीच्या अखेरच्या दिवसात तू सीएसकेच्या कराराची अपेक्षा करू नकोस.'

यामुळे मात्र काही चाहत्यांनी यावर चिंता व्यक्त करत असेही म्हटले आहे की धोनी खेळाडू आहे, त्याला बाद करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज प्रयत्न करणारच, त्यात हर्षलची काहीच चूक नसल्याने त्याला ट्रोल करणे चुकीचे आहे.

Harshal Patel | MS Dhoni | IPL 2024
IPL 2024, CSK: चेन्नई टॉप 4 मध्ये तरी डोकेदुखी वाढली; धोनीचा लाडका बॉलर मायदेशी परतला; जाणून घ्या कारण

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 167 धावा केल्या. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार ऋतुराज गायकवाडने 32 आणि डॅरिल मिचेलने 30 धावांची खेळी केली.

पंजाबकडून गोलंदाजीत राहुल चाहर आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तसेच अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या, तर सॅम करनने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 20 षटकात 9 बाद 139 धावाच करता आल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने 23 चेंडूत 30 धावांची खेळी केली. तसेच शशांक सिंगने 27 धावा केल्या. मात्र, बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

चेन्नईकडून गोलंदाजीत रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.त्याचबरोबर मिचेल सँटेनर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com