Policy Bazaar_ 
अर्थविश्व

Policy Bazaar : पॉलिसी बाझारची IT सिस्टीम हॅक; ग्राहकांच्या डेटाबाबत दिलं स्पष्टीकरण

विमा अॅग्रीगेटर कंपनी पॉलिसी बाझारची आयटी सिस्टीम हॅक झाली असून पॉलिसी बाझारची मूळ कंपनी PB Fintech नं याची माहिती दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : विमा अॅग्रीगेटर कंपनी पॉलिसी बाझारची आयटी सिस्टिम हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. पॉलिसी बाझारची मूळ कंपनी PB Fintech नं ही माहिती दिली. १९ जुलैपासून कंपनीच्या आयटी सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं दिसून आलं होतं पण आता ती दुरुस्त करण्यात आली आहे. ग्राहकांचा डेटाही सुरक्षित असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. (Policy Bazaar IT System Hack of Policy Bazaar company explained about customer data)

कंपनीनं सांगितलं की, १९ जुलैपासून पॉलिसी बाझार कंपनीच्या आयटी सिस्टमच्या काही भागात गडबड झाल्याचं दिसून आलं जी अवैध पद्धतीनं करण्यात आली होती. पण आता ही तांत्रिक समस्या दूर करण्यात आली असून याप्रकरणी पॉलिसी बाझारनं संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि कायद्यानुसार कारवाई देखील केली जात आहे. दरम्यान, कंपनीनं आपल्या ग्राहकांना खात्री दिली आहे की त्यांचा डेटा सुरक्षित असून त्याच्याशी कुठलीही छेडछाड करण्यात आलेली नाही.

कंपनीनं म्हटलं की, या तांत्रिक समस्येचा आम्ही समिक्षा करत असून आत्तापर्यंतच्या पडताळणीत हे आढळून आलंय की, ग्राहकांच्या डेटासोबत कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. पॉलिसी बाझारनं कायमचं आपली सिस्टिमची सुरक्षा आणि अखंडतेला प्राथमिकता दिली आहे. यासंदर्भातील अपडेट आम्ही लवकरच जारी करू.

सध्या शेअर मार्केटमध्ये पॉलिसी बाझारचे शेअर गडगडले

पॉलिसी बाझार १५ नोव्हेंबर २०२१ रोजी बीएसईमध्ये १७.३५ टक्के प्रिमियमवर लिस्टिंग झाली होती. कंपनीचा शेअर त्यावेळी १४७० रुपयांवर होता. पण इतर लिस्टिंग कंपन्यांप्रमाणं पॉलिसी बाझारच्या शेअर्समध्येही घट झाली असून सध्या याचा शेअर ५२२ रुपयांवर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दीड वर्षांनंतर नरेंद्र मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांची भेट! तिकडे अमेरिकेच्या कारवाईत तीन भारतीयांचा मृत्यू; देशात संताप

VIDEO : तुकाराम मुंढे यांचं रक्त काढून...! माजी राज्यमंत्र्याची अजब मागणी, मुख्य सचिवांना लिहिलं पत्र...

Vidhan Parishad Election : मतदानाला काही तास शिल्लक, काँग्रेस उमेदवाराचा डिजिटल प्रचार, पण पक्षाची भूमिका वेगळीच, नेमकं घडतंय काय?

Latest Marathi News Live Update : अमरावती काँग्रेसची पुन्हा बैठक सुरू, वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार?

Waste Project Tender Issue : दक्षताच्या सूचना झुगारुन कचरा प्रकल्पाची निविदा; ठरावीक ठेकादारांना पायघड्या

SCROLL FOR NEXT