money
money google
अर्थविश्व

पोस्ट ऑफिसची डबल मनी स्कीम, विना टेन्शन कमवा दुप्पट नफा...

सकाळ डिजिटल टीम

पोस्ट ऑफिससोबत केंद्र सरकार गुंतवणूक आणि बचतीच्या अनेक योजना चालवते. यात परतावा चांगला मिळतोच शिवाय कोणत्याही प्रकारची रिस्क नाही. तुमचे पैसे पोस्टात अतिशय सुरक्षित असतात. पोस्ट ऑफिसच्या काही स्कीम्समध्ये, फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त व्याजाने पैसे मिळतात. तर काही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीवर तुमचे पैसे दुप्पट करू शकतात. अशी एक योजना आहे, किसान विकास पत्रामध्ये (KVP) गुंतवणूक केल्याने तुम्हाला दुप्पट परतावा मिळतो.

योजनेचे फायदे

किसान विकास पत्र दरवर्षी चक्रवाढ व्याज दराने गुंतवणूकदाराला पैसे देते. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार, सध्या याला वार्षिक 6.9% दराने चक्रवाढ व्याज मिळते. हे दर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहेत.

124 महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट करते. म्हणजेच, जर तुम्ही आज त्यात 5 लाख रुपये गुंतवले तर ते पुढील 10 वर्ष, 4 महिन्यांत तुम्हाला 10 लाख परतावा मिळेल.

मॅच्युरिटी पीरियड 10 वर्ष 4 महिने आहे.

या योजनेत तुम्ही किमान 1,000 पर्यंत गुंतवणूक करू शकता, कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.

सरकार किसान विकास पत्र सर्टिफिकेट 1000 रूपये, 5,000 रूपये, 10,000 रूपये, 50,000 रूपयांमध्ये विकते.

या योजनेअंतर्गत तुम्ही कितीही खाती उघडू शकता.

किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आयकर सूट घेता येते.

यामध्ये काही अटींसह मुदतपूर्व बंद (Premature Closer) करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. खातेदार त्यांचे पैसे 2 वर्ष 6 महिन्यांत काढू शकतात.

कोण उघडू शकते खातं ?

कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.

जॉइंट अकाउंटही उघडले जाऊ शकते, पण एका खात्यात तीनपेक्षा जास्त लोक असू शकत नाहीत.

अल्पवयीन किंवा आजारी व्यक्तीच्या नावाने पालक खाते उघडू शकतात.

10 वर्षांवरील अल्पवयीन व्यक्ती स्वतःच्या नावाने अकाऊंट काढू शकतो.

कोणती कागदपत्रे लागतील ?

KVP अर्ज फॉर्म

आधार कार्ड

पत्त्याचा पुरावा

वय प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचा फोटो

मोबाईल नंबर

सरकारच्या वतीने पोस्ट ऑफिसद्वारे किसान विकास पत्र उपलब्ध करून दिले जाते. KVP प्रमाणपत्रे रोख, चेक, पे ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे खरेदी केली जाऊ शकतात. किंवा तुम्ही या लिंकला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता- किसान विकास पत्र फॉर्म. तुम्ही हा फॉर्म ऑफलाइन भरू शकता आणि कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसमध्ये जमा करू शकता.

नोंद : पोस्ट ऑफीसमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी, तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफीसला प्रत्यक्ष भेट देऊन अधिक माहिती घेऊन, मगच गुंतवणूक करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेवर दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT