अर्थविश्व

दररोज फक्त 33 रुपये गुंतवा अन् मिळवा ७२,०००

सकाळन्यूजनेटवर्क

Post Office Monthly Income Scheme : कोरोनाकाळात भारताची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. अशा काळातही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर पोस्टातील छोट्या बचत (Small Savings Scheme) योजनामध्ये गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय आहे.  पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आता ग्राहकांना मोठा फायदा देऊन जाईल. पोस्टाच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला व्याजदरही मिळतो. आज आपण पोस्ट ऑफिसच्या  रिकरिंग डिपॉजिट या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्याद्वारे आपण कमी गुंतवणूकीत जास्त पैसे कमावू शकता. या योजनेतील गुंतवणूकीवर केंद्र सरकारकडून ७ टक्केंपेक्षा जास्त व्याज दिलं जातं. तर जाणून घेऊया ही योजना काय आहे आणि कशी गुंतवणूक केली जाते. 

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉजिट योजनेमध्ये प्रति महिना एक हजार रुपयांची (प्रति दिवस ३३ रुपये होतील) गुंतवणूक केली. वर्षभराचे १२ हजार रुपये झाले. यावर ७.१० टक्क्यांचं व्याज मिळेल. म्हणजे वर्षाला १२ हजार ४६८ रुपये होतील. ही गुंतवणूक तुम्ही पाच वर्षासाठी केली तर तुम्हाला ७२ हजार १२२.९७ रुपये मिळतील. हीच गुंतवणूक तूम्ही पाच वर्षांपर्यंत केली. तर पाच वर्षांची तुमची जमा रकम ६० हजार रुपये होती. आणि या रकमेवरील व्याज १२ हजार १२२.९७ होईल. पाच वर्षांपर्यंत दररोज ३३ रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर ७२ हजारांपेक्षा जास्त रकम मिळेल. 

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिन्याच्या ठरावीक तारखेला नियमीत रकम भरणं सक्तीचं आहे. एक ते १५ यापैकी कोणतीही तारीख निवडू शकता. जर तुम्ही एक तारखेला पोस्टात खातं उघडलं तर १५ तारखेपर्यंत या योजनेअंतर्गत रकम खात्यात जमा करु शकता. १६ तारखेला खातं उघडल्यास महिनाखेरपर्यंत पैसे जमा करु शकता.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT