अर्थविश्व

पोस्टाची भन्नाट योजना! प्रत्येक महिन्याला खात्यात जमा होणार रक्कम

शरयू काकडे

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही सरकारी छोटी बचत योजना (Small Saving Scheme) आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना दर महिन्याला एक ठराविक रक्कम कमविण्याची संधी देणार आहे. या योजनेअंतर्गत, एकल(Singal) किंवा संयुक्त खात्यात(Joint Account) (ठराविक) एकरक्कमी जमा केली जाते. या रक्कमेच्यानुसार आपल्या खात्यात दरमहा पैसे येत असतात. ही योजना 5 वर्षांची असून पुढे 5-5 वर्षांसाठी वाढवता देखील येऊ शकते. ही योजना पोस्टाची असल्यामुळे यामध्ये कोणताही धोका नसतो आणि यामध्ये सरकार तुमच्या 100 टक्के गुंतवणूकीची गँरटी घेते. (post office monthly income scheme know interest rate features benefits tenure)

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजने(POMIS) अंतर्गत महिन्याला खात्यात जमा होणारी रक्कम कशी ठरवली जाते आणि याचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल याची माहिती जाणून घेऊ या.

पात्रता

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करु शकतो.

या योजनेमध्ये कोणी करावी गुंणवतणूक?

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये ज्यांना महिन्याला ठराविक मिळकत हवी आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम योजना आहे.त्याशिवाय या योजनेत रियार्टमेंटनंतरही मिळालेली ठरविक एकरक्कमेची (Lum Sum Amount) सुरक्षित गुंतवणूक करुन दर महिन्याला ठरलेली रक्कम कमवता येऊ शकते. नियमित परतावा हवा असल्यास इन्टॉलमेंटऐवजी एक रक्कमी गुंतवणूक चांगला पर्याय आहे.

जास्तीत जास्त किती गुंतवणूक करू शकता?

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये एकल(Singal) किंवा संयुक्त(Joint) दोन्ही खाते उघडण्याचा पर्याय आहे. एकल खात्यामध्ये जास्तीत जास्ता 4.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. सयुंक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत जास्तीत जास्त 3 प्रौढ(Adult) व्यक्तींना सयुंक्त खाते उघडता येते पण गुंणतवणूकीसाठी 9 लाखांची मर्यादा लागू केली आहे.

व्याज दर

चालू तिमाहीसाठी, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी सरकारने 6.6 टक्के वार्षिक व्याज दर निश्चित केला आहे.

दर महिन्यात खात्यात येणारी रक्कम कशी ठरवली जाते?

समजा, संयुक्त(Joint) खात्यामधून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये 9 लाख जमा केले.6.6 टक्के वार्षिक व्याज दरानुसार या रक्कमेवर एकूण व्याज 59400 रुपये असेल. या रक्कमेवला 12 महिन्यांमध्ये विभागणी केली जाते. त्यानुसार महिन्याला साधारण 4950 रुपये व्याज खात्यात जमा होतात.

तसेच, जर एकल(Single) खात्यामध्ये 4,50000 लाख रुपये जमा केल्यास महिन्याला मिळणारे व्याज 2475 रुपये होते

खाते कसे उघडावे?

  • तुम्हाला महिन्याला डाकघर खात्यात बचत खाते उघडणे आवश्यक आहे.

  • त्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, किंवा ड्रॉईव्हिंग लायसन ई. असणे आवश्यक आहे.

  • तसेच 2 पासपार्ट साईज फोटो असणे गरजेचे आहे.

  • अॅड्रेस प्रुफसाठी सरकार कडून ओळखपत्र किंवा मुलभूत सुविधांचे बिल असणे आवश्यक आहे.

  • हे कागदपत्र उपलब्ध असल्यास सर्वात आधी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा फॉर्म भरावा लागतो. तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन देखील डाऊनलोड करु शकतो.

  • हा फार्म व्यवस्थित भरा आणि सर्व कागदपत्रांसह जमा करुन तुम्ही खाते उघडू शकता.

  • फार्म भरताना वारसदार(Nominee)चे नाव द्यावे लागते.

  • हे खाते उघडण्यासाठी सुरवातीला 1000 रुपये रोख किवा चेक द्वारे जमा करावे लागतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT