पब्‍लिक प्रॉव्हिडेंड फंड (PPF)  
अर्थविश्व

PPF Account : एकापेक्षा जास्त पीपीएफ अकाऊंट असतील तर ही माहिती महत्वाची

वित्त मंत्रालयाने परिपत्रकाद्वारे पीपीएफ खात्यांच्या विलीनीकरणाच्या अटी स्पष्ट केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

PF Account Alert: भविष्य निर्वाह निधी खाते हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. फेब्रुवारी 2022 च्या अखेरीस, वित्त मंत्रालयाने (Finance Ministry) एका परिपत्रकाद्वारे पीपीएफ खात्यांच्या विलीनीकरणाच्या अटी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार एकावेळी दोन दोन PPF खाती विलीन करता येणार नाहीत, असे सांगितले आहे. पीपीएफ नियम २०१९ नुसार, कोणत्याही व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती असू शकत नाहीत. पण काही विशिष्ट परिस्थितीत एक गुंतवणूकदार एकापेक्षा जास्त खाती उघडू शकतो. मात्र त्यासाठी काही अटी नियम लागून होतात . PPF नियम 2019 नुसार, जर एखाद्या व्यक्तीने 12 डिसेंबर 2019 रोजी किंवा त्यानंतर एकापेक्षा जास्त खाती उघडली तर अशी अतिरिक्त खाती बंद केली जातील. या खात्यांवर PPF व्याज दिले जाणार नाही.

असा आहे नवीन नियम

लोकं याविषयी फारशी माहिती नसल्याने एकापेक्षा जास्त पीपीएफ अकाउंट उघडतात. पण अशा परिस्थितीत त्यानंतरचे खाते सरकार बंद करते. वित्त मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, जर 12.12.2019 रोजी किंवा त्यानंतर कोणतेही PPF खाते उघडले गेले तर, असे खाते कोणत्याही व्याजाशिवाय बंद केले जाणार आहे. अशा PPF खात्यांचे पेमेंट आणि विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव याद्वारे तयार केला जाणार नाही. तसेच असा प्रस्ताव पोस्ट संचालनालयाला पाठवू नये, असेही म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, गुंतवणूकदारांना पीपीएफ खात्यावर वार्षिक ७.१ टक्के परतावा मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT