Tata Steel Google file photo
अर्थविश्व

टाटा स्टील व टाटा वायरमध्ये कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस

श्रमिक उत्कर्ष सभेच्या यशस्वी वाटाघाटी

कृष्ण जोशी

मुंबई : श्रमिक उत्कर्ष सभेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी टाटा समूह व्यवस्थापनाबरोबर (Tata Group Management) यशस्वी वाटाघाटी केल्या आहेत. त्याद्वारे टाटा स्टील (Tata Steel) व टाटा वायर (Tata Wire) मधील कामगार व कर्मचाऱ्यांना 75 हजार रुपयांपर्यंत दिवाळी बोनस मिळेल.

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर लाड यांना मिळालेले हे पहिलेच मोठे यश आहे. लाड तसेच श्रमिक उत्कर्ष सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मे. टाटा स्टील आणि मे. टाटा वायर यांच्या व्यवस्थापनाशी बैठक घेऊन वाटाघाटी केल्या. यावेळी संघटनेचे सरचिटणीस जितेंद्र अण्णा कांबळे आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते. टाटा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार नवीन बोनस करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांना 75 हजार रुपयांपर्यंत बोनस मिळणार आहे.

या कराराबाबत टाटा समूहातील कर्मचारी आणि कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लाड आणि श्रमिक उत्कर्ष सभेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. "कोरोनाच्या या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक अशा काळातही आम्ही यशस्वी वाटाघाटी करू शकलो याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. सकारात्मक प्रतिसाद देत कामगार हिताचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही टाटा व्यवस्थापनाचेही आभार मानतो," असेही लाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT