pre analysis of share market
pre analysis of share market sakal
अर्थविश्व

Share Market मध्ये आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

सकाळ डिजिटल टीम

विकली एक्सपायरी दिवशी बाजारात अस्थिर वातावरण पाहायला मिळाले. शेवटी सेन्सेक्स 230 अंकांनी तर निफ्टी 66 अंकांनी घसरून बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँकेच्या 3 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला.

मात्र, इंट्रा-डेमध्ये निफ्टी बँकेने विक्रमी उच्चांक गाठला. शुक्रवारी पीएसयू बँक आणि इन्फ्रा शेअर्समध्ये खरेदी झाली. दुसरीकडे, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये विक्री झाली. तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक फ्लॅट राहिले. फार्मा, रियल्टी आणि एनर्जी इंडेक्स लाल चिन्हात बंद झाले. (pre analysis of share market 18 November 2022 )

निफ्टी बँक 77 अंकांनी घसरून 42458 वर बंद झाला. तर मिडकॅप 126 अंकांनी घसरून 31072 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 22 शेअर्समध्ये दबाव दिसून आला. तर निफ्टीचे0 पैकी 35 शेअर्स घसरले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 7 शेअर्सवर दबाव दिसून आला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

तांत्रिक दृष्टिकोनातून निफ्टीने इंट्राडे चार्टवर लोअर टॉप फॉर्मेशन तयार केले आहे, जे मोठ्या प्रमाणात नकारात्मक संकेत देत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. पण बाजाराचा मीडियम टर्म ट्रेंड अजूनही तेजीचा दिसत आहे.

या वेळी बुल्ससाठी पहिला रझिस्टंस 18400/62000 वर दिसतो. हा रझिस्टंस वरच्या बाजूने तुटल्यास,तेजी येऊ शकते आणि आपल्याला 18500-18535/62300-62500 पातळी दिसू शकते. दुसरीकडे, बाजार या पातळीच्या खाली घसरला तर ही घसरण आणखी वाढू शकते. अशा परिस्थितीत कॉन्ट्रा ट्रेडर्स 18200/61200 च्या आसपास 18150/61000 च्या सपोर्ट स्टॉपलॉससह खरेदी करू शकतात.

निफ्टीची सुरुवात घसरणीने झाली आणि दिवसभर चढ-खाली होत राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. डेली चार्टवरील आरएसआय (14) इंडिकेटर बियरिश करेक्शनच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. भविष्यात निफ्टी 18300 च्या खाली घसरला तर ही घसरण 18100-18000 पर्यंत वाढू शकते. त्याच वेळी, वरच्या बाजूने निफ्टीसाठी 18450 वर रझिस्टंस दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

टाटा कंझ्युमर्स (TATACONSUM)
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
एल अँड टी (LT)
पॉवरग्रीड (POWERGRID)
एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
फेडरल बँक (FEDERALBNK)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
बँक ऑफ बडोदा (BANKBARODA)
पीएनबी (PNB)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT