Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

निवडक ऑटो, बँकिंग आणि मिडकॅप ऊर्जा शेअर्स चांगले दिसत आहेत पण मेटल शेअर्सवर दबाव कायम राहील.

सकाळ डिजिटल टीम

गुरुवारी शेअर बाजार हिरव्या रंगात अर्थात वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 443.19 अंकांच्या म्हणजेच 0.86 टक्क्यांच्या वाढीसह 52,265.72 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 143.35 अंकांच्या म्हणजेच 0.93 टक्क्यांच्या वाढीसह 15556.65 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात प्रचंड अस्थिरता होती पण व्यापाराच्या शेवटी तो हिरव्या चिन्हात बंद झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. डेली चार्टवर निफ्टीने आदल्या दिवशीच्या घसरणीनंतर जोरदार रिकव्हरी नोंदवली. डेली RSI पॉझिटीव्ह डायव्हर्जन दाखवत आहे, जे येत्या काळात बाजारासाठी चांगले संकेत आहेत.

खाली निफ्टीला 15,400 वर सपोर्ट दिसत आहे. जर निफ्टी 15,400 च्या खाली घसरला तर बाजारात विक्री दिसून येईल. वरच्या बाजूला, निफ्टीला 15,600/15,800 वर रझिस्टंस आहे.

निफ्टीचा ट्रेड कमकुवत राहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे सहज अग्रवाल म्हणाले. यासाठी 15,870 वर रेझिस्टन्स दिसत आहे. जोपर्यंत निफ्टी यावर मोडत नाही तोपर्यंत तो कमजोर राहील. शॉर्ट टर्ममध्ये प्रचंड अस्थिरता असेल असेही ते म्हणाले. निवडक ऑटो, बँकिंग आणि मिडकॅप ऊर्जा शेअर्स चांगले दिसत आहेत पण मेटल शेअर्सवर दबाव कायम राहील.



आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

मारुती (MARUTI)

हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCORP)

आयशर मोटर्स (EICHERMOTORS)

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

बजाज ऑटो (BAJAJAUTO)

रिलायन्स (RELIANCE)

पॉवर ग्रीड (POWERGRID)

कोल इंडिया (COALINDIA)

एनटीपीसी (NTPC)

ग्रासिम (GRASIM)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गात बदल निश्चित! सोलापूर जिल्ह्यापासून नवा मार्ग, मुख्यमंत्र्यांनी सांगितला कसा असेल बदल..

Viral Video: याला म्हणतात नशिबाची फिरकी! Window Seat बुक करूनही मिळाला धक्का; व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीची हिंदी मालिकेत एंट्री; दिसणार भयानक अवतारात; प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

Kolhapur Crime : न्यायालयीन कोठडीत असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला धमक्या देत लाखोंची मागणी; मुरगूडमध्ये खळबळ

Pune News: शिक्षकाला घरातून उचलून आणून गंभीर मारहाण; शिरुर तालुक्यातील धक्कादायक घटना, विद्यार्थ्यांचे आंदोलन!

SCROLL FOR NEXT