Share Market sakal
अर्थविश्व

Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

यूएस फेडच्या बैठकीच्या निर्णयानंतरच बाजाराची दिशा स्पष्ट होईल.

सकाळ डिजिटल टीम

सोमवारी सेन्सेक्स 51 अंकांनी घसरून 62131 वर बंद झाला आहे. तर निफ्टी 18497 वर बंद झाला आहे. निफ्टी बँक 75 अंकांनी वाढून 43709 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 116 अंकांनी वाढून 32491 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्सची विक्री झाली. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 पैकी 28 शेअर्समध्ये खरेदी झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी आठ शेअर्स वाढले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीने गेल्या आठवड्यात शॉर्ट टर्म कंसोलिडेशनच्या टप्प्यात प्रवेश केला होता. यामुळे सोमवारी निफ्टीमध्ये गॅप-डाउन ओपनिंग दिसली. निफ्टी 18300 वर शॉर्ट टर्म सपोर्टकडे घसरला तेव्हा बुल्सकडून सपोर्ट मिळाला.

मात्र सोमवारची रिकव्हरी 18500 च्या जवळ पोहोचल्याने रखडली. निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 18300-18650 दरम्यान कंसोलिडेशनचा साक्षीदार होऊ शकतो. तर दुसरीकडे बँक निफ्टीमध्ये पॉझिटीव्ह मोमेंटम कायम आहे.

सुरुवातीला घसरण झाल्यानंतर सेन्सेक्स-निफ्टीने सोमवारी त्यांचे बहुतांश नुकसान भरून काढल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. पण जवळपास संपूर्ण ट्रेडिंग सत्रात बाजाराने एका रेंजमध्ये व्यवहार केला.

या आठवड्यातील यूएस फेडच्या बैठकीतील निर्णय आणि चलनवाढीच्या आकडेवारीपूर्वी गुंतवणूकदार बहुतेक साईडलाइन राहतील. यूएस फेडच्या बैठकीच्या निर्णयानंतरच बाजाराची दिशा स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

एशियन पेंट्स (ASIANPAINT)
इन्फोसिस (INFY)
कोटक बँक (KOTAKBANK)
टायटन (TITAN)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
डिक्सन (DIXON)
एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)
लॉरस लॅब (LAURUSLABS)
ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)
ऍस्ट्रल (ASTRAL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT