share market google
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

यूएस फेड महागाईशी लढण्यासाठी त्यांचे दर किमान 75 बेसिस पॉइंट्सने वाढवेल अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे

सकाळ डिजिटल टीम

विकली एक्सपायरीच्या दिवशी अर्थात गुरुवारी बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स 98 अंकांनी घसरून 53416 वर आणि निफ्टी 28 अंकांनी घसरून 15939 वर बंद झाला. निफ्टी बँक 177 अंकांनी घसरून 34,651 वर बंद झाला. तर मिडकॅप 24 अंकांनी घसरून 27,804 वर बंद झाला.

गुरुवारी सर्वाधिक खरेदी एनर्जी आणि फार्मा शेअर्समध्ये दिसून आली. त्याचवेळी बँकिंग, आयटी शेअर्समध्येही विक्री झाली. निफ्टीचे 50 पैकी 29 शेअर्स घसरले. त्याचवेळी सेन्सेक्समधील 30 पैकी 15 शेअर्सवर दबाव राहिला. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

गुरुवारी भारतीय बाजारांनी कमकुवत जागतिक संकेतांमुळे सुरुवातीची नफा गमावला आणि शेवटी लाल चिन्हात बंद झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. अपेक्षेपेक्षा जास्त अमेरिकी चलनवाढीचे आकडे बाजारात येण्याची भीती होती, ज्याचा परिणाम स्पष्ट दिसून आला.

यूएस फेड महागाईशी लढण्यासाठी त्यांचे दर किमान 75 बेसिस पॉइंट्सने वाढवेल अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे. दुसरीकडे भारतातील WPI जूनमध्ये किंचित कमी झाला आहे. त्यात आणखी घसरण अपेक्षित आहे.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

विकली एक्स्पायरीच्या दिवशी बाजारात अस्थिरता होती असे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. जागतिक समस्यांसोबतच देशांतर्गत संकेतही संमिश्र संकेत देत आहेत. आता निफ्टी 15900 च्या वर राहणे खूप महत्वाचे आहे. निफ्टी 15900 वर राहिला नाही तर आणखी घसरण होऊ शकते.

निफ्टी दिवसाच्या खालच्या स्तरावरून बंद होण्यापूर्वी रायझिंग चॅनलच्या लोअर बँडजवळ सरकताना दिसल्याचे
LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टी गुरुवारी डेली चार्टवर मुख्य मूव्हिंग एव्हरेजच्या खाली राहिला. डेली RSI देखील बियरीश क्रॉसओव्हरमध्ये आहे. निफ्टीला डाउनसाइडवर 15,850-15,875 वर सपोर्ट आणि वरच्या बाजूस 16,100 वर रेझिस्टन्स दिसतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

ओएनजीसी (ONGC)
डॉ.रेड्डी (DRREDDY)
कोटक बँक (KOTAKBANK)
मारुती (MARUTI)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
एचसीएल टेक (HCLTECH)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCORP)
टेक महिन्द्रा (TECHM)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT