Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

यूएस फेडच्या बैठकीच्या निर्णयानंतर, निफ्टी एकतर 15500 च्या खाली गॅपडाउन ओपनिंग करेल किंवा 15886 च्या वर गॅपडाउन ओपनिंग करेल असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले.

शिल्पा गुजर

बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी काहीशा घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये हलकी खरेदी झाली. ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसली तर रियल्टी, एनर्जी, मेटल शेअर्स घसरले. बुधवारच्या बाजारात सर्वात जास्त दबाव आयटी, एफएमसीजी शेअर्सवर होता. निफ्टीच्या 50 पैकी 26 शेअर्सची विक्री झाली. त्याच वेळी सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स घसरले. निफ्टी बँकेच्या 12 शेअर्सपैकी 8 शेअर्समध्ये घसरण झाली.

सेन्सेक्स 152 अंकांनी घसरून 52541 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 40 अंकांनी घसरून 15692 वर बंद झाला आहे. निफ्टी बँक 28 अंकांनी वाढून 33,339 वर बंद झाला. तर मिडकॅप 93 अंकांनी वाढून 26809 वर बंद झाला.
मंदीची भीती आणि फेड बैठकीच्या निर्णयापूर्वीच्या अस्थिरतेमुळे बाजार पुन्हा लाल चिन्हात बंद झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले होते.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

यूएस फेडच्या बैठकीच्या निर्णयानंतर, निफ्टी एकतर 15500 च्या खाली गॅपडाउन ओपनिंग करेल किंवा 15886 च्या वर गॅपडाउन ओपनिंग करेल असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. खालच्या बाजूला येणारी कोणतीही घसरणीने कमजोरी येऊ शकते. दुसरीकडे, अपसाइड ब्रेकआउट झाल्यास, वरच्या स्तरांवर दबाव दिसून येतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCORP)
ग्रासिम (GRASIM)
ओएनजीसी (ONGC)
एनटीपीसी (NTPC)
इन्फोसिस (INFY)
रिलायन्स (RELIANCE)
विप्रो (WIPRO)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav 2025 : गणरायाच्या आगमन अन् विसर्जनाच्या दिवशी पुण्यात 'ड्राय डे', जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय...

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकार उलथवेन...मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा..

Karad fire Accident: पुणे- बंगळूर महामार्गावर ढेबेवाडी फाट्यावर ई-बाईक खाक; चालक दुचाकी रस्त्याकडेला लावून दूर

Latest Marathi News Updates: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

हो, मी डेट करतेय... घटस्फोट अन् ब्रेकअपनंतर रुपाली भोसले पुन्हा प्रेमात! म्हणाली, 'जो माझ्या आयुष्यात येईल त्याला...

SCROLL FOR NEXT