Share Market Update Sakal
अर्थविश्व

Share Market : बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

बाजारात तेजी कायम राहिली असली तरी अस्थिर बाजारात गुंतवणूकदार सावध दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

मंगळवारी बाजारात सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात तेजी पाहायला मिळाली. बाजाराने इंट्राडेमध्ये पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठला. फार्मा, मेटल आणि एफएमसीजी शेअर्समध्ये दमदार खरेदी दिसून आली.

शेवटी सेन्सेक्स 177.04 अंकांच्या वाढीसह 62681.81 वर आणि निफ्टी 55.20 अंकांच्या अर्थात 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 18618 च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्स-निफ्टीने इंट्रा-डेमध्ये नवा रेकॉर्ड बनवला. पण ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या तासात प्रॉफिट बुकींगमुळे बाजार किंचित वाढून बंद झाला. (pre analysis of share market update 30 November 2022)

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बाजारात तेजी कायम राहिली असली तरी अस्थिर बाजारात गुंतवणूकदार सावध दिसल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. चीनमध्ये वाढत्या विरोधामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे. परिस्थिती सुधारली नाही तर त्याचा भारतीय बाजारावरही परिणाम होऊ शकतो.

तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टी सतत हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन बनवत आहे. बाजारासाठी हे चांगले संकेत आहेत. आता निफ्टीचा सपोर्ट 18450 वरून 18550 वर गेला आहे. जोपर्यंत निफ्टी या सपोर्टच्या वर राहिल तोपर्यंत अपट्रेंडची शक्यता असेल आणि निफ्टी 18750-18800 या पातळीला स्पर्श करताना दिसेल.

बाजारात सकारात्मक अंडरटोन कायम असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. यात इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या मोठ्या कंपन्यांमधील रोटेशनल खरेदीचे योगदान महत्त्वाचे आहे. दुसरीकडे 18700 च्या जवळ निफ्टीसाठी तयार झालेले मिश्र जागतिक संकेत आणि प्रतिकार यामुळे बाजाराची तेजी मर्यादित राहू शकते असेही त्यांचे म्हणणे आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
सिप्ला (CIPLA)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
सनफार्मा (SUNPHARMA)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
ट्रेंट (TRENT)
एमआरएफ (MRF)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)
पर्सिस्टंट (PERSISTENT)


नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या मुलाने दिली धक्कादायक कबुली... आई कुणाकडे पैसे द्यायची? उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले

Gold Rate Today: युद्धाचा परिणाम! सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ; पाहा ताजे भाव

Solapur Car Accident : पहाटे भीषण अपघात ! कार कॅनॉलमध्ये कोसळली, जावई बचावला मात्र पत्नीसह सासू-सासऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Latest Marathi News Live Update : साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

Good Friday 2026: आज 'हॅपी गुड फ्रायडे' का म्हणत नाहीत? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि इतिहास

SCROLL FOR NEXT