Share Market Update Sakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे बाजारातील उत्साह वाढल्याचे दिसून आले.

सकाळ डिजिटल टीम

बुधवारी अर्थात विकली एक्सपायरीच्या दिवसांमध्ये बाजारात चांगले वातावरण दिसून आले. कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे बाजारातील उत्साह वाढल्याचे दिसून आले. निफ्टीमध्ये मोठी वाढ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 616.62 अंकांच्या म्हणजेच 1.16 टक्क्यांच्या वाढीसह 53,750.97 वर बंद झाला. (pre analysis of share market update 7 july 2022)

दुसरीकडे, निफ्टी 178.95 अंकांच्या म्हणजेच 1.13 टक्क्यांच्या वाढीसह 15,989.80 वर बंद झाला. मोठ्या शेअर्ससोबतच छोट्या-मध्यम शेअर्समध्येही खरेदी झाली. निफ्टीचा मिडकॅप इंडेक्स 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला. दुसरीकडे, स्मॉलकॅप इंडेक्स0.03 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. (share market update)

निफ्टी बुधवारी 4आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. एफएमसीजी, ऑटो, रियल्टी शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. बँकिंग, आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली. पीएसई आणि एनर्जी शेअर्स मात्र दबावाखाली राहिले. बुधवारी निफ्टीचे 50 पैकी 40 शेअर्स वाढले तर सेन्सेक्सचे 30 पैकी 25 शेअर्स वधारले. दुसरीकडे, निफ्टी बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये खरेदी दिसली.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?
संमिश्र जागतिक संकेतांमुळे गुरुवारी बाजार तेजीसह बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. मार्केटमध्ये सावध राहा आणि अशा थीममध्ये पैसे गुंतवा ज्यांनी मंदीच्या काळातही ताकद दाखवली आहे. निफ्टी 16200 च्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. आता कंपन्यांच्या निकालांचा हंगाम बाजाराची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

शेअर बाजाराने इतर आशियाई बाजारांपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. प्रचंड अस्थिरता असतानाही, निफ्टीने बुधवारी पुन्हा एकदा 16000 ची पातळी ओलांडण्यात यश मिळवले. गेल्या काही सत्रांमध्ये मंदीची चिंता काहीशी कमी झाली आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतीही नरमल्या आहेत. ज्याचा आज बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास, निफ्टीने आपला 20 दिवसांचा SMA कायम राखला आहे आणि इथून जोरदार पुनरागमन केले आहे. याशिवाय निफ्टीने डेली चार्टवर एक लॉन्ग बुलिश कँडल तयार केली आहे जी पॉझिटीव्ह संकेत देत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज फायनान्स (BAJFINANCE)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
ब्रिटानिया (BRITANNIA)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
ए यु बँक (AUBANK)
ट्रेंट (TRENT)
डिक्सन (DIXON)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT