shaktikant das 
अर्थविश्व

खासगीकरणाची प्रक्रिया लवकरच; सहा बँकांना वगळलं

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (पीएसबी) खासगीकरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. दास म्हणाले, की आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाबाबत सरकारशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच या संदर्भात ही प्रक्रिया पुढे नेण्यात येईल. एका कार्यक्रमात दास म्हणाले, ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण कोणत्याही परिस्थितीत केले जाईल.’

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना यावर्षी दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एका विमा कंपनीच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. सीतारामन यांनी मंगळवारी बँकांच्या खासगीकरणात या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्‍यांच्या हिताची काळजी घेतली जाईल, असे सांगितले होते. त्या म्हणाल्या, की प्रत्येक बँक खासगी होईल असे समजणे योग्य नाही. वर्षानुवर्षे या बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्‍यांच्या हिताची काळजी घेतली जाईल.

‘या’ सहा बँकांचे होणार नाही खासगीकरण
नीति आयोगाने सार्वजनिक क्षेत्रातील सहा बँकांना खासगीकरण योजनेतून वगळले आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), युनियन बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक यांचा समावेश आहे. या बँका एकत्रीकरणाच्या मागील फेऱ्यांचा भाग होते. सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये १० बँकांचे ४ बँकांमध्ये विलीनीकरण केले. यामुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या २७ वरून १२ वर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT