pulses
pulses e sakal
अर्थविश्व

डाळींच्या दरामध्ये कमालीची घट, खाद्यतेल अजूनही आवाक्याबाहेरच

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे (coronavirus) कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी खाद्यतेल विकत घेणे अजूनही परवडण्यासारखे नाही. खाद्यतेलांचे दर (edible oil rate) अवघे पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र, डाळींचे दर शंभरीच्या आत (pulses rate) आल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. (pulses rate decreases due to demand decreases)

खाद्यतेलांचे दर एका किलोसाठी अजूनही १६० ते १५० च्या आसपास आहेत जे १७० ते १८० पर्यंत गेले होते. डाळी मात्र काही प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत. सलग दुसऱ्या आठवड्यात तूर, हरभरा डाळ, खाद्य तेलाचे दर घसरले आहे. दोन महिन्यापूर्वी ११५ रुपये किलोवरील तूर डाळ आता ९५ रुपये तर हरभरा डाळ ८५ रुपयावरुन ६५ रुपये किलोवर आली आहे. खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो दहा रुपयाची घट झाली आहे. मात्र, अन्य किराणा सामानाचे दर चढेच आहेत. त्यावर अंकुश नव्हता. तूरडाळीचे दर गेल्या एक महिन्यात प्रति क्विंटल २५० ते ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. तूर, मूग आणि उडदाच्या दरात प्रत्येकी प्रतिक्विंटल २०० रुपयांची घसरण झाली. देश डाळींमध्ये आत्मनिर्भर व्हावा आणि शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवर प्रतिबंध लावले होते. या वस्तूंच्या आयातीसाठी सरकार व्यापाऱ्यांना परवाना द्यायचा आणि वर्षभराचे आयातीचे प्रमाण ठरवून दिले जायचे; पण आता प्रतिबंध हटविल्याने व्यापाऱ्यांना या वस्तूंची आयात कितीही प्रमाणात करीत आहेत. तसेच ग्राहकांनी डाळींची साठवण न केल्याने भाव आता कमी झालेले आहेत. सध्या आंब्यांचे दरही कमी असल्याने अनेकांनी वरणाऐवजी आंब्याचा रस खाण्याकडे आपला मोर्चा वळवील्यानेही तूर डाळीची मागणी कमी झाल्याचे नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT