Share Market google
अर्थविश्व

Share Market : दिवाळखोर कंपनीची खरेदी ठरली खरेदीदारांच्या शेअर्समधील घसरणीचे कारण

मवारी दालमिया कंपनीने कर्जात बुडालेल्या जेपी ग्रुपची सिमेंट कंपनी खरेदी करणार असल्याचे जाहीर केले.

नमिता धुरी

मुंबई : दालमिया भारत लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज मंगळवारी मोठी घट दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात कंपनीचे शेअर्स ४.६४ टक्क्यांनी घसरून १८१७.२५ रुपयांवर आले. सोमवारी हे शेअर्स १९०५.७० रुपयांवर बंद झाले होते.

कंपनीचे शेअर्स घसरण्यामागे एक मोठा आर्थिक व्यवहार कारणीभूत आहे. सोमवारी दालमिया कंपनीने कर्जात बुडालेल्या जेपी ग्रुपची सिमेंट कंपनी खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये ५ हजार ६६६ कोटी रुपयांचा व्यवहार झाला.

दालमिया भारत लिमिटेडने जेपी समुहातील प्रमुख कंपनी जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड तसेच सहयोगी कंपन्यांचा सिमेंट उद्योग ताब्यात घेतला. या व्यवहाराची सूचना त्यांनी शेअर बाजाराला दिली.

या व्यवहारात वार्षिक ९४ लाख टन क्षमतेची सिमेंट इकाई, ६७ लाख टन क्लिंकर क्षमता तसेच २८० मेगावॅट क्षमतेचे तापीय वीजघर यांचा समावेश आहे. हा व्यवहार ५ हजार ६६६ कोटी रुपयांच्या उद्यममूल्यावर आधारित आहे.

ही सर्व संपत्ती मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व छत्तीसगडमध्ये आहे. या उद्योगांच्या माध्यमातून दालमियांना देशाच्या मध्य भागात आपला जम बसवणे सोपे जाईल.

याच वर्षी अदानी समुहाने सिंगापूरस्थित होल्सिम समुहाची मोठी सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंटचा भारतातील उद्योग ६.५० अब्ज डॉलरना खरेदी केला आहे. जेपीची सिमेंट कंपनीही अदानीच खरेदी करतील अशी चर्चा होती. दालमियांनी केलेल्या व्यवहारामुळे या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT