Cinema Theater, Prozon Mall Remain Close 
अर्थविश्व

PVR, INOX च्या शेअर्सचा उच्चांक, 22 ऑक्टोबरपासून थेटर्स होणार सुरू

PVR, INOX च्या शेअर्सचा उच्चांक

ओमकार वाबळे

येत्या २२ ऑक्टोबरपासून राज्यातील थेटर्स आणि मल्टिप्लेक्सेस पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यानंतर पीव्हीआर आणि आयनॉक्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

मल्टीप्लेक्स ऑपरेट करणाऱ्या पीव्हीआर आणि आयनॉक्स लेझरचे शेअर्स आता आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. मल्टीप्लेक्स उघडण्याची महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतर सोमवारी इंट्रा-डे व्यापारात बीएसईवर 18 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

वैयक्तिक शेअर्समध्ये आयनॉक्स लेझर 18 टक्क्यांनी वाढून 412.20 रुपयांवर पोहोचला. 22 सप्टेंबर 2021 रोजी 384.10 रुपयांची उसळी घेत उच्चांक गाठला होता. या 52-आठवड्यांच्या उच्चांकाला मागे टाकत इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर पीव्हीआर 10 टक्क्यांनी वाढून 1,662 रुपये झाला आहे. 22 सप्टेंबर रोजी स्टॉकने मागील उच्चांकाची (1,631.85) मर्यादा ओलांडली आहे.

आज सकाळी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर 09:45 वाजता; या दोन्ही शेअर्सने उसळी घेतला. आयनॉक्स 10.5 टक्क्यांनी वाढून 387 रुपयांवर आणि पीव्हीआर 6 टक्क्यांनी वाढून 1,599 रुपयांवर आला. बीएसईवर S&P BSE सेन्सेक्स 0.50 टक्क्यांनी वाढून 60,348 वर आला होता.

हिंदी बॉक्स ऑफिसच्या उत्पन्नात सुमारे 25 टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्र चित्रपटगृहांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हे देशातील एकमेव मोठे राज्य आहे ज्याने दुसऱ्या लाटेनंतर कोविड -19 निर्बंध लादल्यापासून अद्याप सिनेमागृहे पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र आता सिनेमागृहांना परवानगी मिळाल्याने पीव्हीआर आणि आयनॉक्स बाजारात चर्चेचा विषय ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT