अर्थविश्व

QR Code Vending Machine : RBI ची क्यूआर कोड कॉईन व्हेंडिंग मशीन कशी काम करणार

सकाळ डिजिटल टीम

QR Code Vending Machine : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज चलनविषयक धोरण समितीचे निकाल जाहीर केले आहेत.

रेपो दरात वाढ करण्यासोबतच यावेळी आरबीआयकडून बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रासाठीही काही घोषणा करण्यात आल्या आहेत.

यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, आरबीआयची क्विक रिस्पॉन्स कोडवर आधारित नाणे वेंडिंग मशीन बसवण्याची योजना आहे.

सेंट्रल बँक क्यूआर कोडवर आधारित कॉईन व्हेंडिंग मशीन सुरू करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नाण्यांचा वापर सुलभ करण्यासाठी हे केले जाणार असून, नवीन QR-कोड आधारित पायलट प्रोजेक्ट म्हणून, ग्राहकांना UPI सुविधेद्वारे याचा फायदा होणार आहे. सुरुवातीच्या काळात भारतातील 12 शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली जाणार आहे.

आरबीआयच्या या पाऊलाकडे एक धोरणात्मक निर्णय म्हणून बघितले जात असून, यामुळे भारतीय देयकांना फायदा होणार आहे.

अशी काम करणार QR कोड आधारित नाणे वेंडिंग मशीन

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 12 शहरांमध्ये QR कोड आधारित कॉईन वेंडिंग मशीनवर (QCVM) पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे.

  • व्हेंडिंग मशीन बसवल्यानंतर ग्राहकांना एटीएम कार्डऐवजी क्यूआर कोड वापरून नाणी काढता येतील.

  • ही व्हेंडिंग मशीन ग्राहकाच्या खात्यातून डेबिट झाल्यावर नाणी वितरीत करेल.

  • व्हेंडिंग मशीन बँक नोटांच्या प्रत्यक्ष पैशांऐवजी UPI वापरून नाणी वितरीत करेल. यामुळे नाण्यांची उपलब्धता सुलभ होणार आहे.

  • या मशीन्सचा वापर करून नाण्यांच्या वितरणास प्रोत्साहन देण्यासाठी बँकांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील असेही दास यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT