Share Market
Share Market Sakal
अर्थविश्व

येत्या एक वर्षात 'हे' 3 शेअर्स करतील मजबूत कमाई!

शिल्पा गुजर

या तिन्ही कंपन्यांचा डिसेंबर तिमाहीत नफा/महसूल चांगला राहिला आहे.

शेअर बाजारात (Share Market) सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेच्या काळात, गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी आहे. त्यामुळेच ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्ट रिसर्चने (ICICI DIRECT RESEARCH) रेडिको खेतान (Radico khetan), पीआय इंडस्ट्रीज (PI Industries) आणि टिमकेन इंडियाच्या (Timken India) शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या तिन्ही कंपन्यांचा डिसेंबर तिमाहीत नफा/महसूल चांगला राहिला आहे. या कंपन्यांचे फंडामेंटल्स चांगले आहेत.

रेडिको खेतान (Radico khetan):

आयसीआयसीआय डायरेक्टने रेडिको खेतान (Radico khetan) चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, शेअरचे टारगेट 1200 रुपये ठेवण्यात आले आहे. 4 फेब्रुवारीला शेअरची किंमत 975.75 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 23 टक्के परतावा मिळू शकतो.

पीआय इंडस्ट्रीज (PI Industries) :

आयसीआयसीआय डायरेक्टने पीआय इंडस्ट्रीजमध्ये (PI Industries) शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे. शेअरचे टारगेट 3375 रुपये दिले आहे. 4 फेब्रुवारी रोजी शेअरची किंमत 2,553 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 32 टक्के परतावा मिळू शकतो.

टिमकेन इंडिया (Timken India):

आयसीआयसीआय डायरेक्टने टिमकेन इंडियामध्ये (Timken India) गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. शेअरचे टारगेट 2405 रुपये ठेवण्यात आले आहे. 4 फेब्रुवारी रोजी शेअरची किंमत 1,977 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 22 टक्के परतावा मिळू शकतो.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Afghanistan Floods : अफगाणिस्तानमध्ये महापूर, ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; अनेक घरं गेली वाहून

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT