राकेश झुनझुनवाला-श्रद्धा कपूर 
अर्थविश्व

शेअर बाजारात कशी गुंतवणूक करायची? बिग बुल झुनझुनवालांचा मोलाचा सल्ला

"तुम्ही तुमचे स्वत:चे पैसे कमावले, तर तुम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही"

दीनानाथ परब

मुंबई: भारतीय शेअर बाजाराचे (Share market) बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची नुकतीच एका वृत्तवाहिनीवर सेलिब्रिटी गेस्ट श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) मुलाखत घेतली. या मुलाखत सत्रामध्ये झुनझुनवाला यांनी आयुष्य, करिअर आणि यशाचा मंत्र या बद्दल चर्चा केली. नव्या वर्षाकडून मला आनंद आणि समाधान हवे आहे, असे बिग बुलने (Big bull) श्रद्धा कपूरशी बोलताना सांगितले.

ते आपल्या मुलांबद्दलही बोलले. प्रत्येकाच्या निवडीचा आदर केला पाहिजे. त्यामुळे मुलांना त्यांच्या आवडीनुसार, पसंतीने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, असे झुनझुनवाला म्हणाले. तुम्ही तुमचे स्वत:चे पैसे कमावले, तर तुम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही, असे राकेश झुनझुनवाला यांचे मत आहे. ईटीनाऊ न्यूजने हे वृत्त दिले आहे.

शेअर बाजारात नव्याने उतरणाऱ्या गुंतवणूकदारांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी कशी सुरुवात करावी? असा प्रश्न झुनझुनवाला यांना विचारण्यात आला. त्यावर बिग बुल म्हणाले की, "शेअर बाजारात गुंतवणूक हे प्रोफेशनल काम आहे. तुम्ही अन्य कुठे गुंतवणूक करता, तसचं शेअर बाजारातील गुंतवणूकीवर सतत लक्ष ठेवलं पाहिजे" "घर किंवा अन्य योजनांमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही जसं नियोजन करता, तसंच शेअर बाजारात गुंतवणूक करताना नियोजन आवश्यक आहे" असं झुनझुनवाला म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर आणखी परिणाम होणार, हवामान विभागाचा अंदाज

Manoj Jarange: मी मॅनेज होणारा नाही ; माझ्या नादी लागू नका! ; राज्य सरकारला मनोज जरांगे यांचा इशारा

Indian Navy: युद्धनौकांसाठी ५३ हजार कोटींचे करार;‘गार्डन रिच’, ‘गोवा शिपयार्ड’ करणार निर्मिती

Human Consciousness: मानवी चेतनेचे उन्नयन

Numerology: पॉकेट मनी उडवत नाहीत तर जपून वापरतात! 'या' ३ मूलांकांची मुले जन्मापासूनच असतात फायनान्शियल जिनियस...

SCROLL FOR NEXT